MIW vs RCBW : मुंबई इंडियन्सचा पराभव करत आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक
MIW vs RCBW Match Report : करो या मरोच्या सामन्यात आरसीबीनं मुंबईचा सत विकेटने पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरलाय.
MIW vs RCBW Match Report : स्मृती मंधानाच्या आरसीबीनं महिला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं आहे. करो या मरोच्या सामन्यात आरसीबीनं मुंबईचा सत विकेटने पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरलाय. याआधीच दिल्ली आणि मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान पटकावले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश संघाचं आव्हान संपुष्टात आले हे. दिल्ली आणि मुंबई इंडियन्स यांचं प्रत्येकी दहा दहा गुण झाले आहेत. तर आरसीबीने 8 गुणांसह प्लेऑफमध्ये थाटात प्रवेश केला. करो या मरोच्या सामन्यात आरसीबीकडून एलिस पैरी हिनं अष्टपैलू खेळीचं प्रदर्शनं केले. तिनं आधी गोलंदाजीमध्ये भेदक मारा केला, त्यानंतर फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. पैरीनं गोलंदाजी करताना मुंबईच्या सहा फलंदाजांची शिकार केली. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद 40 धावांचं योगदान दिलं. एलिस पैरी हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले.
एलिस पैरी आणि ऋचा घोष यांची शानदार फलंदाजी -
एलिस पैरीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचा डाव अवघ्या 113 धावांत संपुष्टात आला. मुंबईनं दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज आमि स्मृती मंधान आणि सोफी मोलिनेक्स स्वस्तात तंबूत परतल्या होत्या. त्याशिवय सोफी डिवाइन हिलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. आरसीबीची अवस्था एकवेळ 3 बाद 39 अशी दैयनीय झाली होती. पण त्यानंतर एलिस पैरी आणि ऋचा घोष यांनी शानदार खेळी केली. दोघींनी झटपट धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला. 114 धावांचं आव्हान 15 व्या षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. आरसीबीकडून एलिस पैरी हिने सर्वाधिक धावा केल्या. पैरी हिने 38 चेंडूमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. तर ऋचा घोष हिने 28 चेंडूमध्ये नाबाद 36 धावांचा पाऊस पाडला. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने 13 चेंडूमध्ये 11 धावा केल्या. सोफी मोलिनेक्स 9 तर सोफी डिवाइन 4 धावा काढून शबनीम इस्माइलच्या चेंडूवर बाद झाली.
An All Round Performance 👌@ellyseperry guides @RCBTweets to the playoffs with a 4️⃣ 🙌
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
Scorecard 💻📱https://t.co/6mYcRQlhHH#TATAWPL | #MIvRCB pic.twitter.com/o4UDT87rQt
एलिस पैरीचा भेदक मारा, मुंबईची दाणादाण
एलिस पैरीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सची तगडी फलंदाजी ढेपाळली. मुंबईचा डाव अवघ्या 113 धावांत संपुष्टात आल. एलिस पैरी हिने मुंबईच्या सहा फलंदाजांन तंबूत पाठवलं. एलिस पैरी हिने चार षटकत अवघ्या 15 धावा खर्च करत सहा विकेट्स घेतल्या. मुंबईकडून हॅली मॅथ्यूज, एस संजन, प्रियांका बाला यांना फक्त दुहेरी धावसंख्या पार करता आली. हरमनप्रीत कौर, एमिलाा केर, पूजा वस्त्रकार यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.