एक्स्प्लोर

वेंकटेश अय्यरचे दमदार शतक, कोलकात्याची 185 धावांपर्यंत मजल

MI vs KKR, IPL 2023 : वेंकटेश अय्यर याचा अपवाद वगळता कोलकात्याचा एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही.

MI vs KKR, IPL 2023 :  वेंकटेश अय्यर याच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकात्याने निर्धारित २० षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. रसेल याने अखेरच्या षटकात 11 चेंडूत 21 धावांचे योगदान दिल्यामुळे कोलकाता सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचू शकले. मुंबईला विजयासाठी 186 धावांची गरज आहे.

वेंकटेशचा शतकी धमाका - 
वानखेडेच्या मैदानावर वेंकटेश अय्यर याने  पहिल्या चेंडूपासूनच धावांचा पाऊस पाडला. वेंकटेश अय्यर याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला वेंकटेशने धावांचा पाऊस पाडला. वेकंटेशने आपल्या शतकी खेळीत नऊ षटकार आणि सहा चौकार लगावले. वेंकटेश अय्यरच्या शतकी खेळीला रायली मेरिडेथ याने संपुष्टात आणले. विशेष म्हणजे.. आयपीएलच्या सोळा वर्षात कोलकात्यासाठी हे फक्त दुरे शतक होय... २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रॅडन मॅक्युलम याने १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याकडून एकही शतक झळकावण्यात आले नव्हते. आज वेंकटेश अय्यर याने शतकी खेळी करत कोलकात्याचा शतकी दुष्काळ संपुष्टात आणला. 

इतर फलंदाजांची कामगिरी कशी - 
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. नारायण जगदीशन खातेही न उघडता तंबूत परतला. कॅमरुन ग्रीन याने त्याचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर गुरबाजही आठ धावा काढून बाद झाला. एका बाजूला वेंकटेश अय्यर धावांचा पाऊस पाडत होता. पण दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या. कर्णधार नीतीश राणा पाच धावा काढून बाद झाला. शार्दुल ठाकूर १३, रिंकू सिंह १८ धावा काढून बाद झाले. 

मुंबईची गोलंदाजी कशी -
मुंबईच्या फिरकी गोलदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. पीयुष चावला याने चार षटकात १९ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर शौकिन याने चार षटकात दोन विकेट घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दसुन जानसेन, रायली मेरिडेथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  दसुन जानसेन महागडा ठरला.. त्याने चार षटकात ५३ धावा खर्च केल्या. अर्जुन तेंडुलकर याने दोन षटकात १७ धावा दिल्या. 

अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण - 

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे आज आयपीएलमध्ये पदार्पण झालेय. अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियनसने आज पदर्पणाची संधी दिली. मागील दोन वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात होता. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. आझ मुंबईने अर्जुनला संधी दिली. मुंबईने अर्जुनला 25 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. 2021 आणि 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाचा भाग होता.. पण त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नव्हते. आज रोहित शर्माने अर्जुनला पदार्पणाची कॅप दिली. कोलकात्याविरोधातील सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची कॅप दिली. प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाल्यानंतर अर्जुनला आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज रोहित शर्मा प्लेईंग ११ चा भाग नाही.. सूर्यकुमार यादव मुंबईचे नेृतृत्व करत आहे.  सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सूर्याने पहिल्या षटकात अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या.दसऱ्या षटकात अर्जुनला तेरा धावा मारल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget