Mumbai Indians IPL 2025 : हार्दिक-रोहित नाही तर कोचचा अहंकार मुंबई इंडियन्सला बुडवणार? मुंबईच्या माजी कर्णधाराने केले गंभीर आरोप
रविवारी आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला.

Mumbai Indians IPL 2025 : रविवारी आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने अशक्य ते शक्य करत विजय मिळवला. अनेक दिग्गज खेळाडूंनी सांगितले की, माजी कर्णधार रोहित शर्मा विजयामागील खरा 'गेम चेंजर' होता. रोहितने डगआउटमधूनच नवीन चेंडू घेण्याचा आणि कुणाला बॉलिंग करायला द्यायची यांचा सल्ला दिला होता. हार्दिक पांड्याने रोहितच्या सल्ला ऐकला, पण तरी आता या संपूर्ण प्रकरणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हरभजन सिंगने जयवर्धनेवर केले गंभीर आरोप....
खरंतर, सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हरभजन सिंगने या संपूर्ण घटनेबाबत मोठा दावा केला. त्याच्या यूट्यूब चॅनलवर हरभजन म्हणाला, 'रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक होता. त्याने प्रशिक्षक महेला जयवर्धनेला करण शर्माला बॉलिंग देण्यासाठी सांगितले. पण असे दिसते की, प्रशिक्षकाला हे आवडले नाही. जर प्रशिक्षकाचे म्हणणे ऐकले असते तर मुंबईने हा सामनाही गमावला असता. कर्णधार मैदानावर नसला तरी त्याची विचारसरणी नेहमीच कर्णधारासारखी असली पाहिजे आणि रोहितने हेच दाखवून दिले.
ROHIT SHARMA - A TRUE LEADER..!!!! 🙇
— Tanuj (@ImTanujSingh) April 14, 2025
- Rohit Sharma's idea to brought back spinner & then Karn Sharma picked those crucial wickets. 🫡pic.twitter.com/j5ujVXzM5Q
हरभजनने जयवर्धनेला दिला सल्ला
खरंतर, हरभजन सिंग देखील मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या हंगामात आतापर्यंतच्या रणनीतीवर नाराज दिसत होता. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या मुंबईच्या मोसमातील सलामीच्या सामन्यासाठीही हरभजनने जयवर्धनेला जबाबदार धरले. हरभजन पुढे म्हणाला, 'करण शर्माने दिल्लीविरुद्ध येताच 3 विकेट्स घेतल्या आणि सामन्याचा मार्ग बदलला. जर लखनौविरुद्ध तिलक वर्माच्या ऐवजी मिचेल सँटनरला पाठवण्याचा निर्णय रोहितने घेतला नसता, आणि कदाचित मुंबईने तो सामनाही जिंकला असता. कधीकधी प्रशिक्षकाने आपला अहंकार बाजूला ठेवून संघाच्या फायद्यांचा विचार करावा.
रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय
या हंगामात रोहित शर्माचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने चिंतेचा विषय राहिला आहे. तो फलंदाजीने संघासाठी फारसे काही करू शकला नाही, त्याने या हंगामात खेळलेल्या 5 डावांमध्ये फक्त 56 धावा केल्या आहेत आणि 11.20 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत. पण, त्याचा अनुभव अजूनही मुंबई इंडियन्ससाठी अमूल्य सिद्ध होत आहेत हे सत्य नाकारता येत नाही. ते वापरून पाहायचे की नाकारायचे याचा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने घ्यायचा आहे.





















