IPL 2024 Playoffs Scenario लखनौ : कोलकाता नाईट राइडर्सने (Kolkata Kinght Riders) लखनौ सुपर जाएंट्सला (Lucknow Super Giants) पराभूत केलं आहे.   केएल राहुलच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जाएंटसला 98 धावांनी पराभूत केलं आहे. मोठ्या फरकानं पराभूत झाल्यानं लखनौला गुणतालिकेत देखील मोठा धक्का बसला आहे. लखनौची पाचव्या स्थानावर घसरण झाली असून यामुळं त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश खडतर झालाय. कोलकाता नाईट रायडर्सकडून दारुण पराभव झाल्यानंतर देखील लखनौला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. लखनौला गुणतालिकेतील पहिल्या टॉप चार मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. 


लखनऊ सुपर जाएंट्ससाठी प्ले ऑफचं समीकरण कसं? 


लखनऊ सुपर जाएंट्सनं 11 मॅचपैकी 6 मॅच जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे 11 मॅचेसमध्ये 6 विजयांसह 12 गुण आहेत. केएल राहुलच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जाएंटस सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जाएंटसच्या अजून 3 मॅच बाकी आहेत. जर, लखनौनं तीन मॅचमध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवल्यास त्यांचे 18 गुण होतील आणि अशा वेळी ते प्ले ऑफमध्ये स्थान पटकावू शकतात.    


लखनौ सुपर जाएंटसच्या मॅचेस कुणाविरुद्ध


आता लखनौ सुपर जाएंटसच्या मॅचेस सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहेत. लखनौ सुपर जाएंटससाठी या मॅचेस महत्त्वाच्या आहेत. लखनौला प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास त्यांना तीन मॅचमध्ये विजय मिळवावा लागेल. लखनौला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 98 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कोलकातानं 6 विकेटवर 235 धावा केल्या होत्या तर लखनौचा संघ 16.1 ओव्हरमध्ये 137 धावांवर बाद झाला.
 
लखनऊ सुपर जाएंटसचा संघ :


लखनऊ सुपर जाएंटसचा संघ : केएल राहुल(विकेटकीपर /कॅप्टन), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ : फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कॅप्टन), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिशेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा


संबंधित बातम्या :


CSK vs PBKS: 1100 दिवस, तीन वर्षांचं वेटिंग, अखेर चेन्नईनं पंजाबला धूळ चारली, सलग पाच पराभवानंतर विजयावर नाव कोरलं 


CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जला दणका,28 धावांनी दणदणीत विजय, गुणतालिकेत उलटफेर