लखनौ : आयपीएलमधील 54 वी मॅच लखनौच्या एकाना स्टेडियमवर पार पडली. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)आणि लखनौ सुपर जाएंटस  (Lucknow Super Giants) आमने सामने आले होते. केएल.राहुलनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सनं 6 विकेटवर 235 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात लखनौ सुपर जाएंटसला अपयश आलं. लखनौ सुपर जाएंटसचा 98 धावांनी पराभव झाला आहे. कोलकातानं लखनौला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसचा संघ पाचव्या स्थानावर घसरला.

  


केएल राहुलनं  25 धावा, अर्शिन कुलकर्णीनं 9, मार्कस स्टॉयनिसनं 36 धावा केल्या.दीपक हुडानं 5 धावा, आयुष बदोनीनं 15 आणि एश्टन टर्नरनं 16 धावा केल्या. लखनौचा संघ 137 धावांवर बाद झाला.  
 
कोलकाताचा कॅप्टन केएल. राहुल यानं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके मारण्याचा दबाव असतो. वेगात धावा काढण्याचा दबाव आमच्यावर होता. आम्ही पुढच्या मॅचमध्ये युवा खेळाडूंच्या मदतीनं कमबॅक करु, असं राहुलनं म्हटलं. सुनील नरेनच्या फलंदाजीनं आमच्या गोलंदाजांवर दबाव आला. आजचा पराभव विसरुन पुढे जाऊ असं खेळाडूंना सांगणार असल्याचं राहुल म्हणाला. 


सुनील नरेनची 81 धावांची महत्त्वाची खेळी  


कोलकाताकडून सुनील नरेन यानं 81 धावांची खेळी केली. नरेन शिवाय फिल सॉल्टनं 32 धावा ,अंगकृष रघुवंशी 32 धावा,  रिंकू सिंग 16 धावा, श्रेयस अय्यर 23 धावा, रमनदीप सिंगनं 25 धावा केल्या. कोलकातानं 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 235 धावांपर्यंत मजल मारली.


दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर, आंद्रे रसेलनं 2 तर मिशेल स्टार्कनं 1 आणि सुनील नरेननं 1 विकेट घेतली.  लखनऊ सुपर जाएंटसचा हा सर्वाधिक धावसंख्येनं पराभव ठरला. 


कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर 


कोलकाता नाईट रायडर्सनं गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. कोलकातानं आणि राजस्थान रॉयल्सच्या नावावर आठ विजयासह 16 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या जोरावर कोलकाताच संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. तर, सनरायजर्स हैदराबादनं आज कोणतीही मॅच न खेळता ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर, लखनौ सुपर जाएंटसची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. 


संबंधित बातम्या : 


LSG vs KKR : कोलकाताचा लखनौवर दणदणीत विजय, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप


Ramandeep Singh : रमनदीप सिंगची अफलातून फिल्डींग, रसेल धावत येत असूनही कॅच पकडला, पाच सेकंदाच्या आत करेक्ट कार्यक्रम, पाहा व्हिडीओ