CSK vs PBKS धर्मशाला: चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) पंजाब किंग्जला (Punjab Kings) 28  धावांनी पराभूत केलं. रवींद्र जडेजाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळं चेन्नईला पंजाब किंग्जला पराभूत करता आलं. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 9 विकेटवर 139 धावा करु शकला. पंजाबच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईच्या तुषार देशपांडे यानं सुरुवातीलाच पंजाबला दोन धक्के दिले. पंजाबनं 10 धावांच्या आतच दोन विकेट गमावल्या होत्या.  पंजाबकडून प्रभासिमरन सिंहनं 23 बॉलमध्ये 30 धावा केल्या. पंजाबचे जॉनी बेयरस्टो, राइली रुसो आणि सॅम करन बाद मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. शशांक सिंहनं 27 धावा केल्या. याशिवाय पंजाबच्या खेळाडूंना मोठी धावसंख्या करता आली नाही.

  


चेन्नई सुपर किंग्जनं विजयासाठी 168 धावांचं लक्ष पंजाब पुढं ठेवलं होतं. पंजाब किंग्जनं पॉवरप्लेमध्ये 2 विकेटवर 47 धावा केल्या होत्या. शशांक सिंह आणि प्रभासिमरन सिंह यांच्यामध्ये 51 धावांची भागिदारी झाली होती. पंजाब किंग्ज कमबॅक करणार असं वाटत असतानाच शशांक सिंह आठव्या ओव्हरमध्ये 27 धावा करुन बाद झाला. यानंतर पंजाबचा डाव गडगडला. यानंतर पुढच्या 16 धावांमध्ये पंजाबनं आणखी 5 विकेट गमावल्या. हर्षल पटेलनं 12 धावा केल्या, तर ब्रारनं 17 धावा केल्या.  


राहुल चहर 16 धावा करुन बाद झाला आणि पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 47 धावांची गरज होती. मात्र, त्यांच्याकडे एक विकेट शिल्लक होती. अखेर 20 ओव्हर संपल्या त्यावेळी पंजाबच्या 9 विकेटवर 139 धावा झाल्या होत्या.  


गोलंदाजांमुळं चेन्नईचा विजय


चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करता आली नव्हती. चेन्नईच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. चेन्नईचे प्रमुख गोलंदाज मथिशा पथिराना, दीपक चाहर आणि मुस्तफिजूर रहमान हे खेळाडू संघात नसताना जडेजा, सिमरनजीतसिंह आणि तुषार देशपांडे यांनी चेन्नईला विजय मिळवून दिला. तुषार देशपांडेनं डावाच्या सुरुवातीलाच दोन विकेट मिळवून दिल्या होत्या. रवींद्र जडेजानं 4 ओव्हरमध्ये 20 धावा देत 3 विकेट घेतल्या. सिमरनजीत सिंहनं आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळली. त्यामध्ये त्यानं 2 विकेट घेतल्या. मिशेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी एक एक विकेट घेतली.  


पंजाब विरुद्ध यापूर्वीचे पाच सामने गमावल्यानंतर आज चेन्नईला तब्बल तीन वर्षानंतर विजय मिळाला आहे. 


संबंधित बातम्या : 


PBKS vs CSK :हर्षल पटेलचा धमाका, भेदक यॉर्करनं धोनीच्या दांड्या गुल, माहीला काही कळलंच नाही, पाहा व्हिडीओ


CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा कमनशिबी ठरला, धोनीचं बारा वर्षापूर्वीचं रेकॉर्ड संकटात, वाचा नेमकं काय घडलं?