धर्मशाला :आज आयपीएलमध्ये 53 व्या (IPL 2024) मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) आमने सामने आले होते. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करताना 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. तर, या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा संघ  20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 139 धावा करु शकला. चेन्नई सुपर किंग्जनं पंजाबला 28 धावांनी पराभूत केलं.चेन्नईचा माजी कॅप्टन आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नवव्या स्थानावर फलंदाजीला आला. पंजाबच्या हर्षल पटेलनं धोनीला शुन्यावर बाद केलं. मात्र, धोनीला नवव्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणनं (Irfan Pathan) टीकेची झोड उठवली आहे. या निर्णयासाठी त्यानं चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) देखील सुनावलं आहे. 


इरफान पठाण काय म्हणाला?


महेंद्रसिंह धोनीला नवव्या स्थानावर फलंदाजीला पाठवणं  चेन्नई सुपर किंग्जसाठी फायदेशीर ठरणार नाही. टीमला त्याचा योग्य फायदा होणार नाही. महेंद्रसिंह धोनीचं वय सध्या 42 वर्ष  असून तो भन्नाट फॉर्ममध्ये हे मला माहिती आहे. धोनीला टॉप ऑर्डरला फलंदाजीला पाठवलं पाहिजे. तो जवळपास 4 ते 5 वर्ष फलंदाजी करु शकतो. धोनीनं अखेरच्या एका किंवा दोन ओव्हरमध्ये फलंदाजी करणं चेन्नईच्या हिताचं ठरणार नाही, असं इरफान पठाण स्टार स्पोर्टससोबत बोलताना म्हणाला. 


चेन्नई सुपर किंग्ज या टप्प्यावरुन प्ले ऑफसमध्ये क्वालिफाय करु शकते असं दिसतंय. तुमच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू फॉर्मध्ये आहे त्याला टॉप ऑर्डरला बॅटिंगला पाठवण्याची गरज आहे. धोनीनं काही वेळा अखेरच्या ओव्हरमध्ये जशी फलंदाजी केलीय तशी तो दरवेळी करु शकणार नाही, असं इरफान पठाण म्हणाला. 


धोनीनं मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, आज टीमला त्याची गरज असताना तुम्ही त्याला मागं ठेवत शार्दूल ठाकुरला फलंदाजीला अगोदर पाठवू शकत नाही. तुम्ही धोनीला नवव्या स्थानावर फलंदाजीला पाठवू शकत नाही. समीर रिझवी देखील 15 व्या ओव्हरमध्ये तयार झालेला होता. चेन्नईला या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे.धोनीला देखील कुणी तरी सांगण्याची गरज आहे की किमान 4 ओव्हर फलंदाजी कर, असं इरफान पठाण म्हणाला.


महेंद्रसिंह धोनीनं यंदाच्या आयपीएलमध्ये 11 पैकी 9 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. धोनीनं 55 च्या सरासरीनं आणि 224.48 च्या स्ट्राइक रेटनं 110 धावा केल्या आहेत. धोनीची यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या 37 इतकी आहे. याशिवाय धोनीनं हार्दिक पांड्याला चार बॉलमध्ये तीन सिक्स मारत 20 धावा केल्या होत्या.  


संबंधित बातम्या :


CSK vs PBKS: 1100 दिवस, तीन वर्षांचं वेटिंग, अखेर चेन्नईनं पंजाबला धूळ चारली, सलग पाच पराभवानंतर विजयावर नाव कोरलं 


CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जला दणका,28 धावांनी दणदणीत विजय, गुणतालिकेत उलटफेर