LSG vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात दिल्लीच्या संघानं लखनौसमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघानं 20 षटकात 3 विकेट्स गमावून 149 धावा केल्या आहेत. दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉनं दमदार खेळी केलीय. त्यानं 34 चेंडूत 64 धावा ठोकल्या आहेत. लखनौकडून रवी बिश्नोईनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. 


नाणेफेक गमवल्यानंतर दिल्लीच्या संघाकडून मैदानात आलेल्या डेव्हिड वार्नरनं निराशाजनक कामगिरी केली. त्याला 12 चेंडूत 4 धावा करता आल्या. तर, पृथ्वी शॉनं 34 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी केली.  त्यानंतर रोवमेन पोवेल याच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यानंही दिल्लीच्या चाहत्यांना निराश केलं. त्यानं 10 चेंडू खेळत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार ऋषभ पंत आणि सरफराज खाननं संघाचा डाव पुढे नेला. या सामन्यात ऋषभ पंतनं 36 चेंडूत 39 तर, सरफराजनं 28 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघान 20 षटकात 3 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. लखनौकडून रवी बिश्नोईनं दोन विकेट्स घेतल्या. तर, कृष्णप्पा गोथमनं एक विकेट्स मिळवली. 


लखौनचा संघ
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अॅन्ड्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान 


दिल्लीचा संघ
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), सरफराज खान, ललित यादव, रोवमेन पोवेल, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुस्तफिजूर रेहमान.  


हे देखील वाचा-