IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत कोलकात्याचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचलाय. कोलकात्यानं चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदाव्या सामन्यात कोलकात्याच्या संघानं मुंबईचा पाच विकेट्सनं पराभव करत सहा गुण प्राप्त केले आहेत. याचं संपूर्ण श्रेय भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला जात आहे. कोलकात्याकडून खेळताना उमेश यादवनं भेदक गोलंदाजी करत विरुद्ध संघाच्या फलंदाजाला मैदानाबाहेर पाठवलं आहे.

आयपीएल 2022 मध्ये उमेश यादवनं पहिल्याच षटकात चेन्नईच्या, बंगळुरू आणि पंजाबची सलामी जोडी तोडली होती. मुंबई विरुद्ध सामन्यात उमेश यादवनं रोहित शर्माला स्वस्तात माघारी धाडलं. ज्यामुळं मुंबईच्या संघावर दबाव निर्माण झाला. आयपीएल 2022 मध्ये उमेश यादवनं आतापर्यंत चार सामन्यात 16 षटक टाकली आहेत. ज्यात निर्धाव षटक आणि 84 धावा देत 9 विकेट्स पटकावले आहेत. 

क्र. खेळाडू सामने डाव षटक धावा विकेट्स बीबीआय सरासरी इकोनॉमी एस.आर 4w/5w
1 उमेश यादव 4 4 16 84 9 4/23 9.33 5.25 10.66 1/0
2 युजवेंद्र चहल 3 3 12 63 7 3/22 9.00 5.25 10.28 0/0
3 आवेश खान 3 3 11.4 95 7 4/24 13.57 8.14 10.00 1/0
4 राहुल चहर 3 3 12 60 6 3/25 10.00 5.00 12.00 0/0
5 वानिंदु हसरंगा 3 3 12 92 6 4/20 15.33 7.66 12.00 1/0
 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 9 विकेट्स घेऊन उमेश यादवनं पर्पल कॅपवर कब्जा केलाय. दरम्यान, भारतीय एकदिवसीय आणि टी-20 संघातून बाहेर झाल्यानंतर आगामी टी-20 विश्वचषकात उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. उमेश यादवनं आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन कायम ठेवल्यास भारतीय संघातही त्याचं पुनारागमन होऊ शकतं.

हे देखील वाचा-