LSG vs DC : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) विरुद्ध सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या या सामन्यासाठी (lucknow supergiants vs delhi capitals) दोन्ही संघाचे चाहते मैदानात उपस्थित असून काही मिनिटांत सामन्याला सुरुवात होत आहे. दिल्लीमध्ये अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आजपासून सामिल झाल्याने त्यांची ताकद अधिक वाढली आहे. दुसरीकडे लखनौचा संघ आधीच चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी मनिष पांडेच्या जागी अष्टपैलू के. गौथमला संधी दिल्याने आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.



लखनौने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 पैकी 2 सामने त्यांनी जिंकल्याने ते पाचव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दिल्ली संघाने आतापर्यंत 2 सामनेच खेळले असून त्यातील एक जिंकला आहे, तर एकात ते पराभूत झाले आहेत. तर अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...


लखनौ अंतिम 11  


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अॅन्ड्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान 


दिल्ली अंतिम 11 


पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), सरफराज खान, ललित यादव, रोवमेन पोवेल, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुस्तफिजूर रेहमान.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha