MI vs KKR : मुंबईविरुद्ध कोलकाता सामन्यात स्टार गोलंदाज पॅट कमिन्सने स्टार फलंदाजाप्रमाणे तुफान फलंदाजी करत अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला एक दमदार विजय मिळवून दिला. यानंतर आता पॅट आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक पूर्ण करणाऱ्या केएल राहुलच्या विक्रमासोबत बरोबरी करण्यातही यशस्वी झाला आहे. त्याने यावेळी डॅनियल सॅम्सच्या एका षटकात 35 धाला ठोकल्या. यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री हे पॅटच्या फलंदाजीचे फॅन झाले असून त्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.


मुंबईला मिळालेल्या या पराभवाबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले,'मुंबईला हा पराभव पचवणं फार अवघड आहे. हे फारच आश्चर्यचकीत कऱणारं असून असं वाटत आहे की, कोणी तुम्हाला चॉकलेट देत असतं आणि तुम्ही घ्यायला गेल्यावर तुम्हाला न देता ते चॉकलेट दुसऱ्याच कुणाला दिलं जात.'


कमिन्सची शानदार फलंदाजी


कमिन्सच्या फलंदाजीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'ही साऱ्यांनाच हैराण करणारी खेळी होती. त्याने एका षटकात 35 धावा केल्या. असे फार कमी सामने पाहायला मिळतात. ज्यात सुरुवातीला सामना एका संघाकडे असतो आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना पलटला जातो. अलीकडे मी इतकी शानदार खेळी पाहिलेली नाही.'  


मुंबईचा 4 विकेट्सनी विजय


मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा 3 आणि ईशान किशन 14 धावा करुन तंबूत परतले. डी ब्रेव्हिसने मात्र 19 चेंडूत 29 धावांची छोटी पण तुफान खेळी केली. ज्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा 52 आणि 38 धावांची खेळी करत 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताने नियमित अंतराने आपल्या विकेट फेकल्या. सलामी फंलदाज अजिंक्य रहाणे 7, कर्णधार श्रेयस अय्यर 10, सॅम बिलिंग्स 17, नितेश राणा 8 आणि आंद्रे रसेल 11 धांवावर बाद झाले. एका बाजूने वेंकटेश अय्यर किल्ला लढवत होता, मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज हराकिरी करत होते. त्यामुळे कोलकाता संघ पराभवाच्या छायेत पोहचला होता. मात्र, पॅट कमिन्स याने वादळी खेळी करत मुंबईला विजयापासून दूर ठेवले. पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान कमिन्सने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. ज्यामुळे अवघ्या 16 षटकात केकेआरचा विजय पक्का झाला


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha