LSG vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात लखनौ आणि दिल्ली यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना अतिशय रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, लखौनौच्या संघानं या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघानं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दुसऱ्या सामन्यात पराभूत झाले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून दोन गुण प्राप्त करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. महत्वाचे म्हणजे, आजच्या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. केएल राहुल (KL Rahul), क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्या नावावर नव्या विक्रमांची नोंद होण्याची शक्यता आहे. 


आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ चार गुणांसह पाचव्या क्रमाकांवर आहे. तर, दिल्लीचा संघ दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. लखनौचं नेतृत्व केएल राहुल करीत आहेत. तर, भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत दिल्लीच्या संघाची धुरा संभाळत आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


केएल राहुल
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घालू शकतो. राहुलच्या सध्या आयपीएलमध्ये 3 हजार 273 धावा आहेत. आजच्या सामन्यात त्यानं आणखी 21 धावा केल्यास तो मुंबईचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डला मागे टाकेल. पोलार्डच्या नावावर 3 हजार 293 धावांची नोंद आहे. 


क्विटंन डी कॉक
आयपीएलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नावावर 2 हजार 234 धावा आहेत. तर, क्विंटन डी कॉकच्या नावावर 2 हजार 325 धावांची नोंद आहे. दिल्ली विरुद्ध आजच्या सामन्यात त्यानं आणखी 10 धावा केल्यास तो सचिन तेंडूलकर यांचा विक्रम मोडित काढणार. 


आवेश खान-
लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने आयपीएलमध्ये आतापर्यंत 36 विकेट घेतल्या आहेत. दिल्लीविरुद्ध सामन्यात एक विकेट्स घेताच तो खलील अहमद, टीम साऊदी आणि युवराज सिंह यांसारख्या दिग्गजांना मागे टाकेल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha