राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
KL Rahul Birthday : भारताचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याचा आज 32 वा वाढदिवस आहे. केएल राहुल याच्यावर क्रिकेट जगतातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
KL Rahul Birthday : भारताचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याचा आज 32 वा वाढदिवस आहे. केएल राहुल याच्यावर क्रिकेट जगतातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सासरे सुनिल शेट्टी, पत्नी आथिया शेट्टी य़ांनीही राहुल याला खास शैलीत शुभेच्छा दिल्या. आयपीएलमध्ये व्यस्त असणाऱ्या केएल राहुल यानं लखनौच्या संघासोबत आपला वाढदिवस साजरा केला. लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलसाठी खास केक पाठवला होता. लखनौच्या सहकाऱ्यासोबत केएल राहुल यानं शानदार वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ लखनौच्या संघाने सोशल मीडियावर पोस्टही केला आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
शुक्रवारी लखनौ आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएलचा सामना होणार आहे. त्याआधी लखनौच्या संघानं केएल राहुलचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. केएल राहुल यानं केक कापला. त्याला सर्वांनी शुभेच्छाही दिल्या. पण त्यानंतर लखनौच्या खेळाडूंनी केक केएल राहुलच्या तोंडावर आणि आंगाला फासला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. केक तोंडावर फासल्यामुळे केएल राहुल ओळखूही येत नाही. राहुलच्या वाढदिवसाचा हा भन्नाट व्हिडीओ लखनौनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ -
KL Rahul birthday celebrations. 😂👌pic.twitter.com/pdTcqRWEF5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 18, 2024
सासऱ्याकडून केएल राहुलला शुभेच्छा -
अभिनेता सुनील शेट्टी यानं केएल राहुल याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. राहुलसाठी सुनील शेट्टी यानं इन्स्टाग्रामवर फोटोसह खास पोस्ट लिहिली आहे. फोटोमध्ये सुनील शेट्टी, अहान शेट्टी आणि केएल राहुल सोफ्यावर आराम करताना दिसत आहेत. सुनील शेट्टीनं जावायला फिल्मी स्टाइल शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये सुनील शेट्टीनं म्हटले आहे की, "आपल्या आयुष्यात काय सुरु आहे हे महत्वाचं नाही, पण आयुष्यात कोण आहे हे महत्वाचं ठरत. तू माझा जावाई असल्यामुळे मी नशीबवान आहे. आपलं नाते कसं आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! तुला खूप सारं प्रेम"
View this post on Instagram
दरम्यान, आथिया शेट्टी हिनेही केएल राहुल याला वाढदिवसाच्या रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत.
"𝘏𝘢𝘱𝘱𝘺 𝘣𝘪𝘳𝘵𝘩𝘥𝘢𝘺, 𝘴𝘰𝘯" 🥹💙 pic.twitter.com/QdKwrXjZm5
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 18, 2024