एक्स्प्लोर

IPL 2022 : मुंबई पुन्हा हारली, कोलकात्याने 52 धावांनी सामना जिंकला 

MI vs KKR, IPL 2022 : जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांच्या दमदार खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावे लागले.

MI vs KKR, IPL 2022 : जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांच्या दमदार खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावे लागले. कोलकात्याने मुंबईचा तब्बल 52 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 113 धावांत गारद झाला. मुंबईच्या संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा नववा पराभव होय.... 11 सामन्यात मुंबईचा हा नववा पराभव झाला. 

सलामी फलंदाज ईशान किशनचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फंलदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. ईशान किशनने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत पाच विकेट घेतल्या होत्या. कोलकात्याने मुंबईचा पराभव करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्माही 6 धावांवर बाद झाला. रमणदीपलाही मोठी खेळी करता आली नाही, तो 12 धावा काढून बाद झाला. टीम डेविड 13 तर पोलार्ड 15 धावा काढून बाद झाले. डॅनिअल सॅम्स 1, एम अश्विन 0, कार्किकेय 3 आणि बुमराह 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. 

एका बाजूला विकेट पडत असताना ईशान किशनने संयमी फंलदाजी केली. ईशान किशनने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. कोलकात्याने मुंबईच्यातीन फलंदाजांना धावबाद केले. पोलार्ड, कार्तिकेय आणि बुमराह धावबाद झाला. कोलकात्याकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर आंद्रे रसेलने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय टीम साऊदी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एका गड्याला तंबूत धाडले.  

दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे प्रथम फंलदाजी करताना कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.  कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. बुमराहने पाच विकेट घेत कोलकात्याचे कंबरडे मोडले.  मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार सलामी दिली. 5.4 षटकांत त्यांनी 60 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर 43 धावा काढून माघारी परतला. चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने अय्यरने 43 धावा चोपल्या. अय्यरनं अजिंक्य रहाणेही लगेच माघारी परतला. रहणेने 25 धावा काढळ्या. नीतीश राणानेही 43 धावांची खेळी केली. अय्यर, रसेल, शेल्ड जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. यांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार अय्यर सहा तर रसेल 9 धावा काढून बाद झाला. रिंकू सिंहने अखेरच्या षटकात फटकेबादी करत कोलकात्याचा डाव 160 पार नेला. सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांना खातेही उघडता आले नाही. 

बुमराहचा भेदक मारा - 
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. बुमराहने चार षटकात फक्त 10 धावा देत पाच विकेट घेतल्या. बुमराहने एक षटक निर्धाव टाकले. तर अखरच्या षटकात फक्त एक धाव दिली.   बुमराहशिवाय कुमार कार्तिकेय याने दोन विकेट घेतल्या. तर डॅनिअल सॅम्स आणि एम अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

कोलकात्याच्या संघात पाच बदल - 
मुंबईच्या फलंदाजीचा कणा असणारा सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत रमणदीप सिंहला संधी देण्यात आली आहे. तर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला. कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget