KKR vs LSG LIVE Updates: रोमहर्षक सामन्यात लखनौचा कोलकात्यावर दोन धावांनी विजय

KKR vs LSG LIVE Updates: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 66 वा सामना खेळला जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 May 2022 11:24 PM
रोमहर्षक सामन्यात लखनौचा कोलकात्यावर दोन धावांनी विजय

 KKR vs LSG: क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) वादळी खेळी आणि मोहसिन खानच्या (Mohsin Khan) भेदक माऱ्यापुढं कोलकात्याचा (KKR) संघानं गुडघे टेकले आहे. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं कोलकात्यासमोर 20 षटकात एकही विकेट गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या संघाला 208 धावांवर रोखलं. अखेरच्या षटकात कोलकात्याच्या संघाला 21 धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. लखनौच्या संघानं हा सामना फक्त दोन धावांनी जिंकला. 


 

KKR vs LSG: कोलकात्याला चौथा धक्का, कर्णधार श्रेय्यर अय्यर आऊट

लखनौविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. कोलकात्याला विजयासाठी 38 चेंडूत 80 धावांची गरज आहे. 

KKR vs LSG: कोलकात्याच्या संघानं दुसरी विकेट गमावली

नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु असलेल्या कोलकात्याच्या संघानं दुसरी विकेट गमावली आहे. अभिजीत टोमरच्या रुपात कोलकात्याच्या संघाला दुसरा धक्का बसलाय. 

KKR vs LSG LIVE Updates: कोलकात्याच्या संघाला पहिला धक्का, व्यंकटेश अय्यर बाद

लखनौच्या संघानं दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याच्या खराब सुरुवात झाली. व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकात्याच्या संघाला पहिला धक्का बसला आहे. 

KKR vs LSG LIVE Updates: लखनौचं कोलकात्यासमोर 211 धावांचं आव्हान

KKR vs LSG, IPL 2022: लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) आणि कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) कोलकात्याविरुद्ध वादळी खेळी केली. या सामन्यात दोघांनीही कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) सुरु असलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत 68 धावा कुटल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लखनौच्या संघानं 20 षटकात एकही विकेट न गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य ठवलंय.  या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून कोणता संघ जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

KKR vs LSG: क्विंटन डी कॉकचं वादळी शतक

लखनौचा विकेटकिपर क्विंटन डी कॉक आज वेगळ्याच अंदाजात दिसला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकात्याविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्यानं वादळी शतक ठोकलं आहे. 

KKR vs LSG: कर्णधार केएल राहुलची अर्धशतकी खेळी

कोलकाताविरुद्ध लखनौच्या संघाची चांगली सुरुवात मिळाली. सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकानंतर केएल राहुलनंही तडाखेबाजी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. 

KKR vs LSG: क्विंटन डी कॉकचं अर्धशतक

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं अर्धशतक ठोकलं आहे. त्यानं 36 चेंडूत 50 धावांचा टप्पा गाठला आहे.

KKR vs LSG LIVE Updates: लखनौची दमदार सुरूवात, केएल राहुल; क्विंटन डी कॉक मैदानात

कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौचा सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकनं संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 67 धावांची भागेदारी झाली आहे. 

KKR vs LSG LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.


 

KKR vs LSG LIVE Updates: कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकिपर), रिंकू सिंह, आंद्रे रसल, सुनील नरायण, उमेश यादव, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती. 


 

KKR vs LSG LIVE Updates: लखनौनं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 66 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून कोणता संघ जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

पार्श्वभूमी

KKR vs LSG LIVE Updates: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 66 वा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील आपपला अखेरचा सामना खेळणार आहेत. दरम्यान, प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघ लखनौशी भिडणार आहे. लखनौनं 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह तिसंर स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे कोलकात्यानं 13 पैकी 6 सामनेच जिंकल्यानं 12 गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत.  


कधी कुठे पाहणार सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स आज  मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानावर आमने सामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्ध्या तासापूर्वी नाणेफेक होईल.कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे.  वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य संघ- 
व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजित/शेल्डन जॅक्सन, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेटकिपर), रिंकू सिंह, आंद्रे रसल, सुनील नारायण, उमेश यादव, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती. 


लखनौ सुपर जायंट्स संभाव्य संघ- 
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बदोनी/मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस/ एव्हिन लुईस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंता चमीरा, आवेश खान. 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.