KKR vs LSG IPL 2024: कोलकाचा दणदणीत विजय, लखनौ सुपर जाएंटसचा सलग दुसरा पराभव

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants: ईडन गार्डन मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहे. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.  

मुकेश चव्हाण Last Updated: 14 Apr 2024 07:02 PM
लखनौ सुपर जाएंटसला पराभवाचा धक्का, कोलकाताचा दणदणीत विजय

लखनौ सुपर जाएंटसला पराभवाचा धक्का बसला आहे. कोलकातानं दणदणीत विजय मिळवला आहे.

कोलकाताचा पलटवार, फिलिप सॉल्टचं अर्धशतक

कोलकातानं दोन विकेट गमावल्यानंतर पलटवार केला आहे. फिलिप सॉल्टनं अर्धशतक केल्यानं केकेआर भक्कम स्थितीत आहे. 

कोलकाताला दुसरा धक्का, रघुवंशी 7 धावांवर बाद

लखनौच्या  मोहसीन खाननं  कोलकाताला दुसरा धक्का दिला आहे. रघुवंशीला त्यानं 7 धावांवर बाद केलं आहे. 

कोलकाताला पहिला धक्का, सुनील नरेन बाद

लखनौच्या मोहसीन खाननं सुनील नरेनला 6 धावांवर बाद केलं आहे.

लखनौच्या 161 धावा, कोलकातापुढं विजयासाठी 162 धावांचं आव्हान

लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 बाद 161 धावा केल्या आहेत. कोलकाताला विजयासाठी 162 धावांची गरज आहे.

लखनौला सहावा धक्का, निकोलस पूरन 45 धावांवर बाद

लखनौ सुपर जाएंटसला सहावा धक्का बसला आहे. निकोलस पूरननं 45 धावा केल्या. 

लखनौला पाचवा धक्का, आयुष बदोनी बाद

लखनौला सुनील नरेननं पाचवा धक्का दिला आहे. आयुष बदोनीनं 29 धावा केल्या. 

लखनौच्या शंभर धावा पूर्ण

निकोलस पूरननं मारलेल्या षटकाराच्या जोरावर लखनौच्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 

लखनौला तिसरा धक्का, के.एल. राहुल बाद

लखनौला तिसरा धक्का बसला आहे. कॅप्टन के.एल. राहुल 39 धावा करुन बाद झाला आहे. त्याला आंद्रे रसेलनं बाद केलं. 

लखनौचा डाव केएल राहुलनं सावरला, कोलकातानं घेतल्या दोन विकेट

लखनौ सुपर जाएंटसचा डाव कॅप्टन  के.एल. राहुलनं सावरला आहे. लखनौच्या आट ओव्हरमध्ये 2 बाद 60 धावा  झाल्या आहेत.

लखनौला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक बाद

लखनौला पहिला धक्का बसला आहे. क्विंट डी कॉक 10 धावा करुन बाद झाला. 

श्रेयस अय्यरनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय

श्रेयस अय्यरनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.  

मिचेल स्टार्कच्या मदतीला गौतम गंभीर धावला

लखनौच्या सामन्याआधी गौतम गंभीर काय म्हणाला, पाहा

लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, अर्शद खान, नवीन-उल-हक/शमर जोसेफ, यश ठाकूर.


इम्पॅक्ट खेळाडू- एम सिद्धार्थ/देवदत्त पडिकल

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य Playing XI

सुनील नारायण, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, नितीश राणा/व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा/वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.


इम्पॅक्ट खेळाडू- सुयश शर्मा.

केकेआर वर्चस्व गाजवणार?

आतापर्यंत कोलकाता आणि लखनौ हे दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले आहेत. मात्र, केकेआरचा फॉर्म लखनौपेक्षा चांगला राहिला आहे. कोलकाताने आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच हैराण केले आहे. अशा परिस्थितीत, आज केकेआर सामन्यावर वर्चस्व गाजवेल.

खेळपट्टी कशी असेल?

कोलकाताचे ईडन गार्डन हे फलंदाजांसाठी चांगले मैदान मानले जाते. चालू हंगामात या मैदानावर एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये फलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकमेव सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. आजच्या सामन्यातही, खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते, परिणामी चाहते उच्च धावसंख्येचा सामना पाहू शकतात. मात्र, वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळते.

पार्श्वभूमी

KKR vs LSG IPL 2024: आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना रंगणार आहे. ईडन गार्डन मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहे. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.