KKR vs GT, IPL 2023 Live : कोलकाता विरुद्ध गुजरात लढत, सामन्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर...

KKR vs GT Live Updates : कोलकाता विरुद्ध गुजरात लढत, सामन्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 29 Apr 2023 07:45 PM
गुजरातचा कोलकात्यावर विजय

गुजरातचा कोलकात्यावर विजय

गुजरातला लागोपाठ दोन धक्के

गुजरातला लागोपाठ दोन धक्के... हार्दिक पांड्या आणि गिल तंबूत परतले

गिल-हार्दिक पांड्याची फटकेबाजी

गिल-हार्दिक पांड्याची फटकेबाजी.. गुजरात एक बाज 80 धावा

गुजरातला पहिला धक्का, साहा बाद

गुजरातला पहिला धक्का, साहा बाद झाला आहे. साहा याने 10 धावांचे योगदान दिलेय.

कोलकात्याची 179 धावांपर्यंत मजल

कोलकात्याची 179 धावांपर्यंत मजल

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत

कोलकात्याला लागोपाठ दोन धक्के

नीतीश राणा आणि वेंकटेश अय्यरच्या रुपाने कोलकात्याला एकापाठोपाठ एक दोन धक्के बसले आहेत. कोलकाता चार बाद 94 धावा

गुरबाजचे दमदार अर्धशतक

गुरबाजचे दमदार अर्धशतक

कोलकात्याला दुसरा धक्का

कोलकात्याला दुसरा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूर एकही धाव न काढता बाद झालाय

नारायण जगदीशन बाद

नारायण जगदीशन बाद... कोलकात्याला पहिला धक्का

जगदीशन-गुरबाजची दमदार सुरुवात

जगदीशन-गुरबाजची दमदार सुरुवात

थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात

थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात

कोलकाता-गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय

कोलकाता-गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय

KKR vs GT, IPL 2023 : गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन

KKR vs GT, IPL 2023 : गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

KKR vs GT, IPL 2023 : कोलकाता संघात 'लॉर्ड' शार्दुलची एन्ट्री, पाहा प्लेईंग 11

KKR vs GT, IPL 2023 : कोलकाता संघात 'लॉर्ड' शार्दुलची एन्ट्री, पाहा प्लेईंग 11


एन जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नारायण, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

KKR vs GT, IPL 2023 Live : गुजरात संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

KKR vs GT, IPL 2023 Live : गुजरात संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

KKR vs GT, IPL 2023 Live : थोड्याच वेळात नाणेफेक

KKR vs GT, IPL 2023 Live : थोड्याच वेळात नाणेफेक

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?


आज गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

IPL 2023 Live, KKR vs GT Playing 11 : गुजरात टायटन्स संभाव्य प्लेईंग 11

GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स संभाव्य प्लेईंग 11


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.

IPL 2023 Live, KKR vs GT Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11

KKR Probable Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स


एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसी, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

KKR vs GT, IPL 2023 Live : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड?

KKR vs GT, IPL 2023 Live : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड?


कर्णधार हार्दिक पांड्यांच्या नेतृत्वात गुजरात संघाने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला. तसेच नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताने बंगळुरुचा 21 धावांनी पराभव केला. कोलकाता संघाचा त्याआधीच्या चार सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघ आजच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. गुजरात संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, कोलकाता संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.

IPL 2023, KKR vs GT : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...

IPL 2023, KKR vs GT : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. गुजरात आणि कोलकाता संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. आज आयपीएलमध्ये या दोन्ही संघातील तिसरा सामना पाहायला मिळणार आहे.

KKR vs GT, IPL 2023 Live : ईडन गार्डन स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार सामना

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज, 29 एप्रिलला पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans)  यांच्यात सामना रंगणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. सलग चार पराभवांनंतर कोलकाता संघाने मागील सामन्यात बंगळुरु संघाचा पराभव केला. तर गुजरात संघाने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.

IPL 2023 KKR vs GT Match Prediction : कोलकाता विरुद्ध गुजरात लढत

IPL 2023 KKR vs GT Match Prediction : कोलकाता विरुद्ध गुजरात लढत


आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 39 वा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील विजयानंतर आज मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत गुजरात संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कोलकाता संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून विजयी मोहिम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 

KKR vsGT, IPL 2023 : कोलकाता आणि गुजरात आमने-सामने

KKR vsGT, IPL 2023 : कोलकाता आणि गुजरात आमने-सामने


कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) यांच्यात 29 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल

पार्श्वभूमी

IPL 2023 KKR vs GT Match Prediction : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 39 वा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील विजयानंतर आज मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत गुजरात संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कोलकाता संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून विजयी मोहिम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 


IPL 2023, GT vs KKR : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड?


कर्णधार हार्दिक पांड्यांच्या नेतृत्वात गुजरात संघाने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला. तसेच नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताने बंगळुरुचा 21 धावांनी पराभव केला. कोलकाता संघाचा त्याआधीच्या चार सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघ आजच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. गुजरात संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, कोलकाता संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.


IPL 2023, KKR vs GT : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. गुजरात आणि कोलकाता संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. आज आयपीएलमध्ये या दोन्ही संघातील तिसरा सामना पाहायला मिळणार आहे.


इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील विजयानंतर आज मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत गुजरात संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कोलकाता संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून विजयी मोहिम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 


KKR vsGT, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) यांच्यात 28 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.