IPL 2022 Point Table : बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा (CSK)  पराभव करत आरसीबीने (RCB)  पुन्हा एकदा गुणतालिकेत टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. आरसीबीने (RCB)  सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीने चेन्नईचा 13 धावांनी पराभव करत दोन गुणांची कमाई केली आहे. या विजयासह आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिंवत राहिल्या आहेत. 
 
या दोन संघाची प्लेऑफमधील जागा फिक्स - 
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने दहा सामन्यात फक्त दोन सामने गमावले आहेत. आठ विजयासह गुजरातचा संघ 16 गुण घेऊन गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे. सध्याचे समीकरण पाहाता गुजरातने उर्वरित चारही सामने गमावले तरीही त्यांचे प्लेऑफमध्ये पोहचणे फिक्स आहे. आतापर्यंत पाहिल्यास 16 गुणांसह संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. लखनौ संघानेही दहा सामन्यात सात विजय मिळवले आहेत. 14 गुणासह लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखौ संघाला उर्विरत चार सामन्यात फक्त एक विजय मिळवायचाय. 16 गुणांसह लखनौचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो.. 

राजस्थानला संधी - 
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघालाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची मोठी संधी आहे. राजस्थान संघाने दहा सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित चार सामन्यात दोन विजय मिळववायचेत... 

आरसबीच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे... आरसीबीने सहाव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर झेफ घेतली आहे... पाहा गुणतालिका... 

क्रमांक संघ सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 गुजरात 10 8 2 0.158 16
2 लखनौ 10 7 3 0.397 14
3 राजस्थान 10 6 4 0.340 12
4 आरसीबी 11 6 5 -0.444 12
5 हैदराबाद 9 5 4 0.471 10
6 पंजाब 10 5 5 -0.229 10
7 दिल्ली 9 4 5 0.587 8
8 कोलकाता 10 4 6 0.060 8
9 चेन्नई 10 3 7 -0.431 6
10 मुंबई 9 1 8 -0.836 2

हे देखील वाचा-