ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) बुधवारी वार्षिक क्रमावारीका जाहीर केली आहे. टी-20 क्रिकटमध्ये भारतीय संघ नंबर वन ठरला आहे. घरच्या मैदानावरील सातत्यानं प्रभावी कामगिरी केल्यामुळं भारतीय संघाला टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळालं आहे. तर, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ कितव्या क्रमांकावर आहे? यावर एक नजर टाकुयात.


टी-20 क्रिकेटमध्ये भारत अव्वल
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघ पहिल्याच फेरीत T20 विश्वचषकातून बाद झाला होता. मात्र, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं भारतीय दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 3-0 नं पराभूत केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. मग श्रीलंकेचा 3-0 असा पराभव करून टी-20 मालिका जिंकली. टीम इंडिया 270 गुणांसह दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेली आहे. यादीत इंग्लंडचा संघ 265 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आणि चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. तर, डिफेंडिंग वर्ल्ड कप चॅम्पियन 251 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 


आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमवारी
आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे 105 अंक असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 105 गुणांसह भारतीय संघ आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमावारीत चौथ्या स्थानावर आहे.


आयसीसी वार्षिक कसोटी क्रमवारी
कसोटी क्रमवारीत गेल्या 5 वर्षांपासून अव्वल असलेला भारतीय संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर,9 गुणांची आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहचलाय. आयसीसी वार्षिक कसोटी क्रमवारीत भारताची 119 गुण आहेत. त्याचबरोबर एशेजमध्ये इंग्लंडचा 4-0 असा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आता 128 गुण झाले आहेत.


हे देखील वाचा-