DC vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022)  दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. गुणतालिकेचा विचार करता पाचव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्लीही चार विजयासंह सातव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.

  


दिल्ली विरुद्ध हैदराबाद Head to Head


आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदा दोघांचाही फॉर्म समसमान असल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की. 


आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  


दिल्ली - ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर. 


हैदराबाद - अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी. नटराजन 


हे देखील वाचा-