Liam Livingstone : आयपीएल म्हटलंकी दमदार फटकेबाजी. फलंदाजांच्या बॅटमधूनन मोठमोठे शॉट्स यावेळी पाहायला मिळतात. गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यातही लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) डीवाय पाटील स्टेडियमवर असाच एक गगनभेदी षटकार ठोकला. विशेष म्हणजे आयपीएल 2022 मधील हा सर्वात लांब षटकार ठरला. दरम्यान यानंतर राशिदने येऊन चक्क लियामची बॅट तपासली. अर्थात बॅटची क्वॉलिटी, स्ट्रोक पाहण्यासाठी राशिदने अशी कृती केली. पण नेटकऱ्यांनी याचा भलताच अर्थ काढत राशिद बॅटमध्ये स्प्रिंग चेक करत होता की काय? असे मीम्स शेअर केले आहेत.



पंजाबच्या डावातील 16 व्या षटकात  लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर 117 मीटर अंतरावर षटकार ठोकला. जो आयपीएल 2022 मधील सर्वात लांब षटकार ठरला. लिव्हिंगस्टोनचा हा शॉट पाहून समालोचक, चाहते आणि खेळाडू थक्क झाले. यंदाच्या हंगामात लिव्हिंगस्टोनं 100 मीटर पेक्षा लांब षटकार मारण्याची तिसरी वेळ आहे. 


पंजाबचा गुजरातवर आठ विकेट्सनं विजय


मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियम मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं गुजरातनं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. तर, शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबच्या विजयाच्या शिल्पकार ठरला.  


हे देखील वाचा-