RCB vs CSK, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 49 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने 174 धावांचे आव्हान चेन्नईला दिले, पण चेन्नईचे फलंदाज हे आव्हान पार करु शकले नाहीत. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर चेन्नई पराभूत झाली आहे. चेन्नईचा संघ 20 षटकांत 160 धावाच करु शकला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
RCB vs CSK 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मात्र असं झालं नाही चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली तरीही चेन्नईचा संघ पराभूत झाला.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज बंगळुरुच्या गोलंदाजांनी 174 धावाचं आव्हानात्मक लक्ष्य डिफेन्ड करायचं होतं, जे काहीसं अवघड असलं तरी गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हे करुन दाखवलं. यावेळी हर्षलने महत्त्वाची मोईन अलीची विकेट घेत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चेन्नईकडून कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
- पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून कोहली आणि फाफने उत्तम सुरुवात केली. पण फाफ 38 धावांवर बाद होताच. कोहलीही 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा डाव ढासळेल असे वाटत होते.
- पण त्याचवेळी माहिपाल लोमरोरने 42 धावांची तुफानी खेळी करत एक उत्तम धावसंख्येकडे संघाला नेलं.
- अखेरच्या षटकात कार्तिकने 26 धावांची फटकेबाजी करत संघाला 173 धावा करुन दिल्या.
- 174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली.
- गायकवाड 28 धावा करुन बाद होताच कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला.
- त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या.
- अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला.
- त्यामुळे चेन्नईचे कॉन्वे सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने सामना 13 धावांनी त्यांनी गमावला.
हे देखील वाचा-