IPL Media Rights LIVE : आयपीएलचे डिजीटल मीडिया राईट्स कुणाला मिळणार; पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IPL Media Rights 2023-27 LIVE Updates:आयपीएल स्पर्धेच्या मीडिया आणि डिजीटल राइट्ससाठी आज बोली लागणार असून यात बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल आहेत. नेमके हे राईट्स कोणाला मिळतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2022 03:50 PM
IPL Media Rights : लिलाव पोहोचला 42 हजार कोटींवर

बीसीसीआयला आयपीएलच्या मीडिया राईट्समधून बराच फायदा होणार हे नक्की आहे. आता कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बीचा लिलाव 42 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे एका सामन्यांच्या लाईव्ह टेलिकास्टमधून बीसीसीआय 100 कोटींहून अधिक पैसे कमवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

IPL Media Rights : 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचला लिलाव

विचार केल्यानुसार बीसीसीआयला आयपीएलच्या मीडिया राईट्समधून बराच फायदा होणार हे नक्की आहे. कारण कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बीचा लिलाव आतापर्यंत 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.कॅटेगरी ए मध्ये भारतातील टीव्ही सामन्याचे मीडिया राईट्स तर कॅटेगरी बी मध्ये डिजीटल प्लॅटफॉर्मचे राईट्स आहेत.

IPL Media Rights : आयपीएल जगातील सर्वाधिक कमाई मिळवून देणारी लीग : गांगुली

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल जगातील सर्वाधिक नफा मिळवून देणारी लीग असल्याचं म्हटलं आहे. प्रसिद्ध फुटबॉल लीग इंग्लिश प्रिमीयर लीगपेक्षा आयपीएलचा रिव्हेन्यू अधिक असल्याचं गांगुली म्हणाला.

IPL Media Rights : निकाल कधीपर्यंत येणार?  

सध्या लिलाव प्रक्रिया सुरु असली तरी खेळाडूंच्या लिलावाप्रमाणे ही प्रक्रिया तितकी वेगवान नाहीये. खेळाडूंच्या ऑक्शनवेळी अगदी काही मिनिटांमध्ये खेळाडूंवर बोली लावून खेळाडूंची विक्री होते. पण मीडिया राईट्सच्या या लिलावात मात्र बराच वेळ ही प्रक्रिया चालते. आजच्या दिवसात मीडिया राईट्स कुणाकडे जाणार याचे उत्तर समोर येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हे निर्णय़ येण्यासाठी सोमवार सायंकाळ किंवा मंगळवार देखील उजाडू शकतो.

IPL Media Rights : 70 हजार कोटींहून अधिकला विकले जातील मीडिया राईट्स : ललित मोदी

आयपीएल सुरु करण्याचा महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ललित मोदी यांनी या लिलावात मीडिया राईट्स तब्बल 10 बिलीयन डॉलर्सच्या घरात विकले जाऊ शकतात असं भाकित केलं आहे. विशेष म्हणजे 10 बिलीयन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयानुसार जवळपास 78 हजार कोटी इतके होतात.

IPL Media Rights : डिजीटल आणि टीव्हीसाठी वेगवेगळे पॅकेज

यावेळी डिजीटल आणि टीव्ही राईट्स वेगवेगळ्या पॅकेजमध्ये वाटले गेले आहेत. यावेळी या वेगवेगळ्या पॅकेजसाठी हा लिलाव पार पडणार आहे.
 

IPL Media Rights : बीसीसीआयला तगडा फायदा होणार

यंदा या लिलाव प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल होणार असून यामुळे BCCI ला जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

IPL Media Rights : आगामी आयपीएलला या लिलावाचा फायदा

बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंह धुमाल यांनी या लिलावातून आलेल्या पैशाचा फायदा आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नक्कीच होईल असा विश्वास दर्शवला आहे.

IPL Media Rights : मुंबईत सुरु आहे लिलाव 

मीडिया राइट्ससाठी सुरु असलेली ही लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) मुंबई येथे पार पडत आहे. सर्व दिग्गज कंपन्या या लिलावात सामिल झाल्या आहेत.  

IPL Media Rights : 'या' सात कंपन्या शर्यतीत

मीडिया राईट्स मिळवण्यासाठी आज वायकॉम 18, सोनी, झी, स्टार हॉटस्टार, फन आशिया, सुपर स्पोर्ट, टाईम्स इंटरनेट या कंपन्यांमध्ये चुरशीची लढत असणार आहे.

IPL Media Rights : पुढील पाच वर्षांसाठीच्या राईट्ससाठी आज लिलाव 

आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) घेत आहे.  

पार्श्वभूमी

IPL Media Rights : बीसीसीआय (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) घेत आहे. यंदा या लिलाव प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल होणार असून यामुळे BCCI ला जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. या लिलाव प्रक्रियेतून अॅमेझॉन कंपनीने या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्यानंतर इतर चार बड्या कंपन्यात चुरशीची टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वायकॉम 18, सोनी, झी आणि स्टार हॉटस्टार या कंपन्या आहे. सध्या हे सर्व हक्क स्टार हॉटस्टार यांच्याकडे असून आपल्याकडीस हे डिजीटल राईट्स कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. तर झी, वायकॉम 18, सोनी यांच्यातही याच्यासाठी चुरशीची शर्यत असेल.


यावेळी डिजीटल आणि टीव्ही राईट्स वेगवेगळ्या पॅकेजमध्ये वाटले गेले आहेत. यावेळी या वेगवेगळ्या पॅकेजसाठी हा लिलाव पार पडणार आहे. पहिलं पॅकेज भारतीय उपमहाद्वीपच्या टीव्ही राइट्ससाठी आहे. यामध्ये भारत तसंच दक्षिण आशिया देशांतील IPL सामने टीव्हीवर प्रसारण करण्याचे राइट्स यावेळी देण्यात येतील. या पॅकेजची बेस प्राइस 49 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या पॅकेजमध्ये भारतीय उपमहाद्वीपच्या डिजीटल राइट्सचा लिलाव होईल. यामध्ये दक्षिण आशियामध्ये IPL चं डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रसारण करण्याचे राइट्स असतील. या पॅकेजची बेस प्राइस 33 कोटी रुपये आहे. तिसऱ्या पॅकेजमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असतील. यात सीजनचा पहिला सामना, वीकएंडदिवशी होणारे डबल हेडरमधील सायंकाळचे सामना, चार प्लेऑफचे सामने यासाठी बोली लावण्यात येईल. यावेळी एका सामन्यासाठीची बेस प्राइस 11 कोटी रुपये असणार आहे. चौथ्या पॅकेजमध्ये भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. याठिकाणी एका सामन्याची बेस प्राइस 3 कोटी रुपये असणार आहे.  


यावेळी चारही पॅकेजमधील सर्व सामन्यांची बेस प्राइस पाहता 5 वर्षांसाठीची एकूण बेस प्राइस 32 हजार 890 कोटी रुपये इतकी असेल. ज्यामुळे बीसीसीआयला कमीत कमी 32 हजार कोटी तरी मिळतीलंच, पण इतक्या मोठ्या कंपन्या समोर असल्याने 5 वर्षांसाठी मीडिया राइट्स मिळवण्यासाठी 50 ते 55 हजार कोटी या कंपन्या खर्च कऱण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बीसीसीआय मालामाल होऊ शकते.


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.