Jasprit Bumrah leaving Mumbai Indians Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)च्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यासाठी काही दिवसांत बीसीसीआयकडून याबाबतचे नियम आणि कायदे जारी केले जातील.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एक खास खेळाडू संघ सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो. याआधी सूर्यकुमार यादव आणि माजी कर्णधार रोहित शर्मा संघ सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. असे झाल्यास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असू शकतो.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 2023 च्या आयपीएल हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सचे कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने आधीच संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचवेळी मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव संघातून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत. आता या 2 खेळाडूंनंतर आणखी एका मोठ्या खेळाडूचे नाव समोर आले आहे.
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सला सोडणार....
नुकत्याच आलेल्या एका अहवालात अशी बातमी समोर येत आहे की, टीमचा सर्वात अनुभवी आणि सामना जिंकणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह आता मुंबई इंडियन्सला अलविदा करू शकतो. खरंतर, असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असू शकतो. बुमराह त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मुंबई फ्रँचायझीसोबत आहे आणि जर तो इतर कोणत्याही संघात गेला. तर पाच वेळा चॅम्पियन संघाला त्याची जागा शोधणे खूप कठीण होणार आहे.
रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स बुमराहला कायम ठेवण्यास तयार आहे. मात्र त्याने स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावाही केला जात आहे की बुमराह एमआय सोडून गुजरात टायटन्स संघात सामील होऊ शकतो. यासंदर्भात दोन्ही फ्रँचायझींमध्ये व्यापार करारही झाला आहे. मात्र, जोपर्यंत अधिकृतपणे काही समोर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे कठीण आहे.
हे ही वाचा -
Richest Cricketer in the World : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? कोणाची संपत्ती किती?