CSK IPL 2025 Retention Players List : इंडियन प्रीमियर लीग 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. ज्यासाठी फ्रँचायझी आगामी मेगा लिलावासाठी त्यांच्या रिटेन्शन शॉर्टलिस्टला अंतिम रूप देण्याची तयारी करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप मेगा लिलाव आणि कायम ठेवण्याबाबत नियम जारी केलेले नाहीत. बीसीसीआयच्या रिटेनशन पॉलिसीबाबत संपूर्ण क्रिकेट जगताच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. इतर कोणत्याही फ्रँचायझीपेक्षा चेन्नई सुपर किंग्स नियम समजून घेण्यास अधिक उत्सुक आहेत.
खरंतर स्टार महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार की नाही हे बीसीसीआयचे नियमच ठरवतील. मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई फ्रँचायझीने रिटेन्शन नियम लागू होण्यापूर्वीच आपल्या 5 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले आहे. जर नियम फ्रँचायझीच्या बाजूने असतील तर ते या 5 खेळाडूंना कायम ठेवेल. या यादीत अनेक आश्चर्यकारक नावे समोर आली आहेत.
'या' खेळाडूंना कायम ठेवणार सीएसके
सीएसकेने मेगा लिलावापूर्वी ज्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे त्यांची यादी आधीच तयार केली आहे. पण, बीसीसीआयने राईट टू मॅचसह 6 खेळाडूंना कायम ठेवण्यास फ्रँचायझींना परवानगी दिल्याचे वृत्त आहे, परंतु अद्याप अधिकृत निर्णय दिलेला नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त, सीएसकेच्या कायम ठेवण्याच्या यादीत रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे.
अनेक दिग्गज खेळाडू जाणार संघाबाहेर
दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरेल मिशेल, महिश तिष्ना आणि अजिंक्य रहाणे यांना कायम ठेवण्याच्या यादीत स्थान मिळाले नाही. धोनी 2025च्या हंगामात खेळवा यासाठी सीएसके त्यांच्या काही अव्वल खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. सीएसकेच्या बॉसने यापूर्वी बीसीसीआयला जुना नियम परत आणण्याची विनंती केली होती, ज्याने फ्रँचायझीला अनकॅप्ड श्रेणीमध्ये निवृत्त खेळाडू ठेवण्याची परवानगी मिळते.
निवृत्त खेळाडूंशी संबंधित नियम 2008 मध्ये उघड झाला होता. तो 2021 पर्यंत होता जो नंतर काढण्यात आला. धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यांना निवृत्त होऊन 5 वर्षे झाली. बीसीसीआयने हा नियम पुन्हा लागू केल्यास धोनीचे खेळणे निश्चित होईल. चेन्नईचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. यावेळी कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची खडतर कसोटी लागणार आहे.
हे ही वाचा -