Richest Cricketer in the World : भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी भारतीयांचा आवडता खेळ क्रिकेटचं आहे, हे सर्वश्रुत आहे. भारतीय क्रिकेटप्रमाणे आपल्या आवडत्या खेळाडूंवर प्रचंड प्रेम करत असतात. मैदानावर असो की स्टेडियम बाहेर लोक आपल्या आवडत्या खेळाडूविषयी प्रेम व्यक्त करत असतात. दरम्यान, कोट्यावधी चाहते असलेल्या क्रिकेट खेळाडूंमध्ये कोणाची संपत्ती सर्वात जास्त आहे? कोण जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे ? जाणून घेऊयात...
सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर
भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. सचिनने जवळपास 10 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, अजूनही श्रीमंतीच्या बाबतीत तो टॉपवर आहे. सचिन तेंडुलकरची संपत्ती जवळपास 1250 कोटी रुपयांची आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिन समालोचन आणि जाहिरातींमध्ये काम करताना दिसला आहे.
कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची संपत्ती किती?
सचिननंतर या यादीत दुसरं नाव आहे. कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचं...मिडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीची संपत्ती जवळपास 1040 कोटी रुपयांची आहे. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार म्हणून धोनी भारतात कमालीचा लोकप्रिय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमधून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. जाहिरातीमधूनही धोनी पैसे कमावतो.
सचिन तेंडुलकर आणि मेहेंद्रसिंग धोनीनंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची संपत्ती जवळपास 1020 कोटी रुपयांची आहे. 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा विराटही संघाचा भाग होता. त्यानंतर नुकताच 2023 मध्ये भारताने टी 20 विश्वचषक जिंकलाय. या वर्ल्डकपमध्ये विराटने महत्वाची भूमिका बजावली होती.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीमध्ये चौथ्या क्रमाकांवर आहे. सौरव गांगुलीची संपत्ती 634 कोटी संपत्ती आहे. त्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या यादीत टॉप 4 मध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सौरव गांगुली यांच्यावर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी होती.
रिकी पॉटिंगची संपत्ती किती?
श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर विदेशी खेळाडूचे नाव आहे. ऑस्ट्रेलियाला अनेकदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पॉटिंगची संपत्ती 480 कोटी रुपयांची आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला गोलंदाजी, फलंदाजी आणि श्रेत्ररक्षण, या तिन्ही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी पॉटिंगने सर्वोतोपरी प्रयत्न केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या