एक्स्प्लोर

Suryakumar Yadav : या क्षणासाठी सर्वांनी वाट पाहिली, रिषभ पंतसाठी सूर्यकुमार यादवची भावनिक पोस्ट

Suryakumar Yadav : दिल्ली कॅपटिल्सचा कॅप्टन रिषभ पंत यानं आज 454 दिवसानंतर कमबॅक केलं आहे. यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर चंदीगड येथे प्रेक्षकांनी रिषभला स्टँडिंग ओवेशन दिलं.

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन रिषभ पंतनं (Rishabh Pant)  आज 454 दिवसांनंतर कमबॅक केलं आहे. रिषभ पंतनं मैदानात प्रवेश केला तो क्षण त्याच्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट रसिकांसाठी आनंदाचा ठरला होता. रिषभ पंत ज्यावेळी बॅटिंगसाठी मैदानात उतरला त्यावेळी मोहालीतील प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन देत त्याचं स्वागत केलं. रिषभ पंतसाठी टीम इंडियाचा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) ट्विट केलं आहे. 

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्यकुमार यादवनं रिषभ पंतसाठी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिषभचा बटिंगसाठी ग्राऊंडवर आल्यानंतरचा व्हिडीओ सूर्यकमारनं पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सूर्यकुमारनं रिषभ पंतसाठी खास मेसेज लिहिला आहे.  आपण सर्वजण आतापर्यंत या क्षणाची वाट पाहत होतो. प्रेरणादायी मूव्हीज खूप पाहिल्या पण या रिअल लाइफ कथेला तोड नाही, असं सूर्यकुमार यादवनं म्हटलं आहे. सूर्यकुमार यादवच्या एक्स प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड  29 धावा करुन बाद झाल्यानंतर रिषभ पंतनं बॅटिंगसाठी मैदानावर एंट्री केली. यावेळी मैदानातील प्रेक्षकांनी त्याचं उभं राहून स्वागत केलं. सूर्यकुमार यादवनं त्या क्षणाची व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. सूर्यकुमारनं त्या क्लीपसोबत रिषभ पंतसाठी काही ओळी लिहिल्या आहेत.

रिषभ पंत आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, रिषभनं 13 बॉलमध्ये  18 धावा केल्या.रिषभ पंत बॅटिंगद्वारे कमाल करु शकला नाही. मात्र, विकेटकीपींग करताना रिषभनं त्याचा जलवा कायम असल्याचं दाखवून दिलं. रिषभनं जितेश शर्माला विकेटकीपींगद्वारे आऊट केलं. 

रिषभचं कमबॅक मात्र दिल्ली पराभूत  

आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरुवात विजयानं करण्याचा दिल्लीचा प्रयत्न फसला. दिल्लीला पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जनं प्रथम टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगला आमंत्रित केलं होतं. दिल्लीची सुरुवात अडखळत झाली होती. दिल्लीचा संघ 150 धावा करु शकेल की नाही अशी शक्यता असताना अभिषेक पोरेल याच्या  फटकेबाजीमुळं दिल्लीनं 9 बाद 174 धावा केल्या.मात्र,पंजाबनं सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या बॅटिंगच्या जोरावर 4 विकेटनं दिल्लीवर विजय मिळवला. 

सूर्यकुमार यादव गुजरात विरुद्धच्या लढतीला मुकला

मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज अशी सूर्यकुमार यादवची ओळख आहे. सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना जखमी झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमध्ये तरी सूर्यकुमार यादव क्रिकेट खेळताना पाहायाला मिळेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, नॅशनल क्रिकेट अकादमीकडून सूर्यकुमार यादव फिट असल्याचं प्रमाणपत्र न मिळाल्यानं मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिल्या लढतीतून त्याला बाहेर बसावं लागलं आहे. 

संबंधित बातम्या :

KKR vs SRH : केकेआरच्या टॉप ऑर्डरनं हैदराबादसमोर नांगी टाकली,श्रेयस अय्यर ते नितीश राणा स्वस्तात बाद

PBKS vs DC : पंजाबच्या ओपनर्सची आक्रमक सुरुवात, इशांत शर्मानं कसा लावला ब्रेक,जाणून घ्या

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget