RCB vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबादकडे धमाकेदार कामगिरी करण्याची संधी, आरसीबीसाठी करो या मरो स्थिती

RCB vs SRH Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज सनरायडर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. आयपीएलमधील ही 41 वी लढत आहे.

युवराज जाधव Last Updated: 25 Apr 2024 11:30 PM
महिनाभरानंतर मिळवला विजय

महिनाभरानंतर आरसीबीला आयपीएलमध्ये विजय मिळाला आहे. आरसीबीनं 25 मार्च रोजी पंजाब किंग्सचा पराभव केला होता. त्यानंतर आरसीबीला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज, 25 एप्रिल रोजी आरसीबीने विजय मिळवलाय. करो या मरोच्या सामन्यात आरसीबीनं हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. 

हैदराबादचे आठ फलंदाज तंबूत

हैदराबादचे आठ फलंदाज तंबूत

हैदराबादला सातवा धक्का

पॅट कमिन्स यानं 15 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. सिराजनं घेतला झेल... 

हैदराबादला सहावा धक्का

कर्ण शर्मानं हैदराबादला दिला सहावा धक्का... अब्दुल समद 10 धावा काढून बाद

हैदराबादची सुरुवात खराब, अर्धा संघ तंबूत

आरसीबीच्या गोलंदाजीसमोर हैदराबादच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. 69 धावांमध्ये हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतलाय. अभिषेक शर्मानं 31 धावांची खेळी केली. ट्रेविस हेड 1, एडन मार्करम 7, नितीश रेड्डी 13 आणि हेनरिक क्लासेन सात धावां काढून तंबूत परतले. शाहबाज अहमद आणि अब्दुल समद सध्या मैदानावर आहेत. 9 षटकानंतर हैदराबाद पाच बाद 85 धावा..

आरसीबीला पहिलं यश

विल जॅक्सनं ट्रेविस हेडला पाठवलं तंबूत...  हैदराबादला पहिला धक्का

आरीसीबीची 206 धावांपर्यंत मजल

हैदराबादला विजयासाठी 207 धावांचं आव्हान

RCB ला सहावा धक्का

षटकार मारण्याच्या प्रयत्नात दिनेश कार्तिक बाद झालाय. कार्तिकनं सहा चेंडूमध्ये 11 धावा केल्या. 

आरसीबीला पाचवा धक्का

 


जयदेव उनादकटनं घेतली तिसरी विकेट.. महिपाल लोमरोर याला पाठवलं सात धावांवर तंबूत

आरसीबीला चौथा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने आरसीबाला चौथा धक्का बसलाय. विराट कोहली अर्धशतकानंतर बाद झालाय.

विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीनं 37 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलेय. 

आरसीबीला तिसरा धक्का

अर्धशतकानंतर रजत पाटीदार बाद झालाय. आरसीबी 3 बाद 130 धावा... 

आरसीबीला दुसरा धक्का

मयांक मार्कंडेय यानं विल जॅक्सला बाद करत आरसीबीला दिला दुसरा धक्का.. जॅक्स 9 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला.

आरसीबीला पहिला धक्का

कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या रुपाने आरसीबीला पहिला धक्का बसलाय. फाफने 12 चेंडूत केल्या 22 धावा... 

आरसीबीची शानदार सुरुवात

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी शानदार सुरुवात केली. दोन षटकांमध्ये 24 धावा केल्या वसूल

आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

विराट कोहली, फाफ डु प्लेलसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्गुसन, मोहम्मद सिराज, यश दयाल


इम्पॅक्ट सब - सुयेश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशु शर्मा, विजयकुमार वैशाख, स्वप्नील सिंह

हैदराबादच्या संघात कोण कोणते शिलेदार ? 

अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडेय, टी नटराजन


इम्पॅक्ट सब - उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, ट्रेविस हेड

आरसीबीनं नाणेफेक जिंकली

आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार

SRH vs RCB : सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी 

सनरायजर्स हैदराबाद सातपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.   

आरसीबीसाठी करो या मरोची स्थिती 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी करो या मरोची स्थिती आहे. आठ मॅचपैकी सात मॅचमध्ये आरसीबीचा पराभव झाला असून ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत. 

SRH vs RCB Live : आरसीबीमध्ये मॅक्सवेलचं कमबॅक होणार? 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल संघाबाहेर आहे. दुखापतीमुळं तो संघाबाहेर असून त्याऐवजी कॅमेरुन ग्रीन खेळतोय. त्याला देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही.

हैदराबादच्या ग्राऊंडवर आयपीएल मॅचेसचे रेकॉर्ड

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 73 मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ 32 वेळा जिंकले आहेत. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारे संघ 41 वेळा जिंकले आहेत. या ग्राऊंडवरील सर्वात कमी स्कोअर 80 तर सर्वाधिक धावसंख्या 277 इतकी आहे. 

SRH vs RCB Live : हेड टू हेड 

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 24 वेळा आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं 13 वेळा विजय मिळवला तर आरसीबीनं 10 वेळा विजय मिळवला. एका मॅचचा निकाल लागला नव्हता. 

पार्श्वभूमी

SRH vs RCB, IPL 2024 Sun Risers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live : आयपीएलमध्ये आज पॅट कमिन्सच्या नेतृ्त्त्वातील सन रायजर्स हैदराबाद आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 41 वी लढत आहे. बंगळुरुत झालेल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं आरसीबीला पराभूत केलं होतं. सनरायजर्स हैदराबादनं 3 विकेटवर 287 धावा केल्या होत्या. आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली होती. सनरायजर्स हैदराबाद 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, आरसीबी दहाव्या स्थानावर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.