नवी दिल्ली : आयपीएल (IPL 2024) मध्ये आज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आमने सामने आले आहेत. दिल्लीच्या होमग्राऊंडवर ही मॅच होत असून रिषभ पंतनं टॉस जिंकला आहे. अरुण जेटली स्टेडियमवरील आजची पहिली मॅच आहे. दिल्लीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय दिल्लीला महागात पडला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई केली. ट्रेविस हेडनं (Travis Head) 16 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्याला अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) देखील साथ दिली. सनरायजर्स हैदराबादनं सहा ओव्हरमध्ये 125 धावा केल्या. 


सनरायजर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं केली. सनरायजर्स हैदराबादनं आक्रमक सुरुवात केली असून पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 19 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेडनं खलील अहमदच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा काढल्या. तर अभिषेक शर्मानं चार धावा केल्या होत्या. यानंतर ट्रेविस हेडनं गियर बदलला. ट्रेविस हेडनं पुन्हा एकदा बॉलर्सला धु धु धुतलं आहे.ट्रेविस हेडनं आज पुन्हा एकदा बॉलर्सची धुलाई केली. त्यानं 16 बॉलमध्येच अर्धशतक केलं. ट्रेविस हेडनं पॉवरप्लेमध्ये 5 सिक्स आणि 11 चौकार मारत 26 बॉलमध्ये 84 धावा केल्या. 


दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई


अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई केली आहे. खलील अहमदनं एका ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या. ललित यादवनं  दोन ओव्हर्स टाकल्या त्यात त्यानं 41 धावा दिल्या. नॉर्खियाला देखील हैदराबाच्या सलामीवीरांनी जोरदार चोपलं. नॉर्खियानं एका ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या. कुलदीप यादवनं 20 तर मुकेश कुमारनं 22 धावा दिल्या.


दिल्ली की हैदराबाद विजयी कोण होणार?


सनरायजर्स हैदराबादचा यंदाच्या आयपीएलमधील हा सातवा सामना आहे. हैदराबादनं यापूर्वी झालेल्या सहा मॅचपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर, दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनं यापूर्वी झालेल्या सात पैकी चार मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्सनं तीन मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जाएंटस आणि  गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. 


संबंधित बातम्या :


IPL 2024 Rishabh Pant : मर्सिडीज, फोर्डसारख्या महागड्या गाड्या, दिल्लीत आलिशान घर; करोडपती ऋषभ पंतकडे संपत्ती किती?


 IPL 2024 : ना रोहित ना विराट! आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगानं कोण पाडतंय धावांचा पाऊस? टॉपरचं नाव वाचून धक्का बसेल!