नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आमने सामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. दिल्लीनं गेल्या दोन मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्सला पराभूत केलं आहे. गुजरात टायटन्सवर सहा विकेटनं विजय मिळवल्यानंतर दिल्लीचं मनोबल वाढलेलं आहे. दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंत (Rishabh Pant) याची कामगिरी देखील या सर्वामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे. आज दिल्ली कॅपिटल्सपुढं सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असेल. दिल्ली कॅपिटल्स होमग्राऊंडवर विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. 


रिषभ पंतची नेटवर्थ किती ? (Rishabh Pant Net Worth)


डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अखेर दोन वर्षानंतर रिषभ पंतनं आयपीएलमध्ये कमबॅक केलेलं. आहे. रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स साठी चांगली कामगिरी करत आहे. दिल्ली अंडर 19, भारताची अंडर 19 टीम असा प्रवास करत रिषभ पंतनं भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावलं. रिषभ पंतची नेटवर्थ कोट्यवधी रुपयांची असून ब्रँड एंडोर्समेंटद्वारेदेखील तो पैसे कमावतो. 


रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. दिल्ली कॅपिटल्सकडून रिषभ पंतला 16 कोटी रुपये मिळतात. जाहिरातीतून देखील रिषभ कमाई करतो. माध्यमांच्या रिपोर्टनुसार रिषभ पंतची नेटवर्थ 80  कोटी रुपये आहे. रुरकी आणि दिल्लीतदेखील रिषभ पंतचं घर आहे. डेहराडून आणि हरिद्वारमध्ये मध्ये देखील त्यानं गुंतवणूक केली आहे. 


रिषभ पंतकडे लक्झरी कार देखील आहेत. मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही, ऑडी 48, ह्युंदाई आय 20, फोर्ड या कार आहेत.जाहिरातीमधूनदेखील रिषभ पंतला चांगले पैसे मिळतात. ड्रीम 11, अदिदास, बुस्ट,रियल मी, बोट, कॅडबरी आणि एसजी या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये रिषभ पंत काम करतो. 


रिषभ पंतनं आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले असून 43.67 च्या सरासरीनं 2271 धावा केल्या आहेत.एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला असता त्यानं 30 मॅच खेळल्या असून 34.60 च्या सरासरीनं 865 धावा केल्या आहेत. तर, 66 टी 20 मॅचमध्ये 22.43 च्या सरासरीनं 987 धावा केल्या आहेत.


रिषभ पंत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आक्रमकपणे बॅटिंग करु शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या :


MS Dhoni : धोनी आयपीएल एका गोष्टीमुळं सोडणार?जुन्या सहकाऱ्याच्या सूचक वक्तव्यानं माहीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं


 IPL 2024 : ना रोहित ना विराट! आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगानं कोण पाडतंय धावांचा पाऊस? टॉपरचं नाव वाचून धक्का बसेल!