लखनौ : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) फलंदाजीची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आयपीएलच्या (IPL2024) मॅचेसला मोठी गर्दी करत आहेत. चेन्नईमधील चेपॉक, मुंबईचं वानखेडे स्टेडियम असो की लखनौचं एकाना स्टेडियमवर धोनीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. महेंद्रसिंह धोनीनं मुंबईपाठोपाठ लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध जोरदार फलंदाजी केली. धोनीनं लखनौ विरुद्ध 2 षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर 9 बॉलमध्ये 28 धावा केल्या. धोनीनं मुंबई इंडियन्स विरुद्ध हार्दिक पांड्याला सलग तीन षटकार मारले होते. त्यानं चार बॉलमध्ये  20 धावा केल्या होत्या. धोनीनं यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीलाच चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं होतं. यानंतर महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनीचा एकेकाळचा सहकारी रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) मोठं वक्तव्य केलं आहे. 


रॉबिन उथप्पा काय म्हणाला?


मुंबई असो की लखनौ महेंद्रसिंह धोनीनं जोरदार फटकेबाजी केलेली आहे. ही फटकेबाजी पाहण्यासाठी धोनीचे चाहते आतूर असल्याचं पाहायला मिळतं. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं जिओ सिनेमासोबत बोलताना म्हटलं की केवळ एकच गोष्ट धोनीला थांबवू शकते. ती म्हणजे त्याचं आरोग्य होय. फिटनेसच्या कारणामुळं तो पुढे खेळणार नसल्याची शक्यता आहे. धोनीची क्रिकेटप्रती आत्मीयता खूप आहे, त्याला क्रिकेट खेळत राहावं वाटतं पण केवळ धोनीच्या क्रिकेट करिअरला त्याचं शरीर किंवा फिटनेस ब्रेक लाऊ शकतं, असं रॉबिन उथप्पा म्हणाला. 


यंदाच्या आयपीएलची पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाली होती. चेन्नईच्या चेपॉकवर पहिला सामना पार पडला होता. या मॅचपूर्वी सर्व संघांच्या कॅप्टनचं फोटोशूट करण्यात आलं होतं. यामध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड कॅप्टन म्हणून सहभागी झाला होता. यानंतर महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कॅप्टनपद सोडल्याचं समोर आलं होतं. या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी विकेटकीपर फलंदाज म्हणून सहभागी झालाय. 


धोनी ग्राऊंडवर येताच बॉलर्सवर दबाव वाढला


महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमवरील चाहते आतूर असतात. धोनी मैदानावर बॅटिंगला उतरताच चाहत्यांचा जल्लोष सुरु होतो. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू झहीर खाननं याबाबत बोलताना म्हटलं की स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष वाढू लागलाय, धोनीच्या स्टेडियमवर असण्याचा हा जलवा आहे. धोनी प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. महेंद्रसिंह धोनी ग्राऊंडवर फलंदाजीला येताच स्टेडियवरील चाहत्यांचा वाढता जल्लोष गोलंदाजांवर दबाव वाढतोय, असं झहीर खान म्हणाला. 


संबंधित बातम्या :


 आयपीएलमध्ये चौकार षटकरांचा पाऊस, सर्वाधिक वेगानं कुणी काढल्या धावा? टॉप 3 मध्ये केवळ एक भारतीय


सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हार्दिकने घोषणा दिल्या!