RR vs GT Live Score, IPL 2024 : राजस्थानची हाराकिरी, जिंकलेली मॅच गमावली, राशिद खान ठरला जाएंट किलर

RR vs GT Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 24 वी मॅच आहे.

युवराज जाधव Last Updated: 10 Apr 2024 11:37 PM
गुजरात आणि राजस्थान मॅच रोमांचक स्थितीत, एका ओव्हरमध्ये 15 धावांची गरज

गुजरात आणि राजस्थान मॅच रोमांचक स्थितीत पोहोचली असून  गुजरातला एका ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे.  

गुजरातला सहावा धक्का, आवेश खानकडून शाहरुखानची विकेट

गुजरात टायटन्सला सहावा धक्का बसला आहे.आवेश खाननं शाहरुख खानला बाद केलं. 

गुजरातला पाचवा धक्का, शुभमन गिलला जाळ्यात ओढलं,

गुजरात टायटन्सला पाचवा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला चहल आणि संजू सॅमसन या दोघांनी चपळाईनं आऊट केलं. 

RR vs GT : गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद, चहलनं घेतली विकेट

गुजरातला चौथा धक्का बसला असून विजय शंकर 16 धावा करुन बाद झाला आहे. त्याला चहलनं बाद केलं.  

शुभमन गिलच्या 50 धावा पूर्ण

शुभमन गिलनं आज देखील अर्धशतक झळकवलं आहे.  त्यानं एका बाजूनं गुजरातचा डाव सावरला. 

गुजरातच्या 100 धावा पूर्ण, शुभमन गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

गुजरातच्या 100 धावा पूर्ण झाल्य असून  शुभमन गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

कुलदीप सेनचं वादळ, गुजरातला तिसरा धक्का

कुलदीप सेननं एकाच ओव्हरमध्ये गुजरातला तिसरा धक्का दिला आहे. गुजरात टायटन्सचा अभिषेक मनोहर 1 रन करुन बाद झाला. 

गुजरातला दुसरा धक्का, मॅथ्यू वेड बाद

पाऊस थांबल्यावर खेळ सुरु झाल्यानंतर गुजरातला दुसरा धक्का बसला आहे. मॅत्यू वेड 4 धावा करुन बाद झाला. 

पावसाचा व्यत्यय, गुजरातच्या 10 ओव्हर्समध्ये 1 बाद 77 धावा

पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळ थांबवण्यात आला असून  गुजरातच्या 10 ओव्हर्समध्ये 1 बाद   77 धावा झाल्या आहेत. 

गुजरातला पहिला धक्का, साई सुदर्शन 35 धावा करुन बाद

गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला आहे. गुजरातचा सलामीवर साई सुदर्शन 35 धावा करुन बाद झाला आहे. 

गुजरातची राजस्थान विरुद्ध सावध सुरुवात, पाच ओव्हरमध्ये 30 धावा

गुजरातनं राजस्थान विरुद्ध सावध सुरुवात केली आहे. पाच ओव्हरमध्ये गुजरातनं 30 धावा केल्या आहेत. 

राजस्थानचं गुजरातला विजयसाठी 197 धावांचं आव्हान

राजस्थाननं गुजरातला विजयसाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे.  राजस्थाननं गुजरात विरुद्ध 3 बाद 196 धावा केल्या. रियान परागनं 76  तर संजू सॅमसननं 68 धावा केल्या.  

राजस्थानला तिसरा धक्का, रियान पराग 76 धावांवर बाद

राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे. रियान पराग 76 धावांवर बाद झाला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या 150 धावा पूर्ण

राजस्थान रॉयल्सनं 16 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण केल्या आहेत. संजू सॅमसन आणि रियान परागनं त्यांचा डाव सावरला. 

राजस्थानचा डाव रियान पराग अन् संजू सॅमसननं सावरला

राजस्थानचा डाव रियान पराग अन् संजू सॅमसननं सावरला आहे. दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर रियान परागनं अर्धशतकी खेळी केली. तर त्याला संजू सॅमसननं साथ दिली. 

रियान परागचं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं अर्धशतक

रियान परागनं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं अर्धशतक केलं आहे.त्यानं राजस्थान रॉयल्सचा डाव सावरला.

RR vs GT : राजस्थानची सावध सुरुवात, 10 ओव्हरमध्ये 73 धावा

राजस्थान रॉयल्सनं यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर बाद झाल्यानंतर सावध खेळी केली आहे. पहिल्या 10 ओव्हरमध्ये आरसीबीच्या 2 बाद 73 धावा झाल्या आहेत. 

RR vs GT : राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का, जोस बटलर 8 धावांवर बाद

RR vs GT : राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का बसला असून  जोस बटलर 8 धावांवर बाद झाला आहे. त्याला राशिद खाननं बाद केलं. 

RR vs GT : यशस्वी जयस्वाल बाद, राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का

RR vs GT : यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानं राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वाल 24 धावा करुन बाद झाला.  

राजस्थानची सावध सुरुवात

राजस्थाननं सावध सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सनं दोन ओव्हर्समध्ये बिनबाद 13 धावा केल्या आहेत. 

RR vs GT Toss Update : गुजरात टायटन्सनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय

RR vs GT Toss Update : गुजरात टायटन्सनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय शुभमन गिलनं घेतला आहे.  

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील मॅचचा टॉस पावसामुळं रखडला

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळं टॉस थोड्या उशिरानं होणार आहे.  

GT vs RR : गुजरात टायटन्सला डेव्हिड मिलर नसल्याचा फटका

गुजरात टायटन्सला पाच पैकी तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. डेव्हिड मिलर फिट नसल्यानं गुजरातला त्याचा फटका बसतोय. 

RR vs GT : राजस्थान रॉयल्सच्या जमेच्या बाजू 

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आणि जोस बटलर दोघेही फॉर्ममध्ये आहेत. जोस बटलरनं आरसीबी विरुद्ध शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. तर, संजू सॅमसननं 69 धावांची खेळी केली होती.

यशस्वी जयस्वालचा फॉर्म राजस्थानसाठी चिंतेचा विषय

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवर यशस्वी जयस्वाल याच्या फॉर्मची चिंता संजू सॅमसनला लागली आहे. राजस्थाननं चार मॅच जिंकल्या असल्या तरी त्यामध्ये यशस्वी जयस्वाल केवळ 39 धावा करु शकला आहे. 

पार्श्वभूमी

RR vs GT Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गेल्या आयपीएलमधील उपविजेती टीम गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सनं पाचपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला असून त्यांना केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.