IPL 2024, RCB vs CSK Live Score : बंगळुरुचा 'विराट' विजय; धोनीच्या चेन्नईला बाहेर काढलं, 27 धावांनी मिळवला विजय

RCB vs CSK Live Score, IPL 2024 : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. प्लेऑफचं तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

युवराज जाधव Last Updated: 19 May 2024 12:12 AM
बंगळुरुचा 'विराट' विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामन्यात बंगळुरुने 27 धावांनी विजय मिळवला

ड्यू प्लेसीसची सुपर कॅच

चेन्नईला सहावा धक्का, मिचेल सँटनर झेलबाद झाला आहे. फॅफ ड्यू प्लेसीसने झेप घेत एका हातात झेल घेतला.

चेन्नईला पाचवा धक्का, शिवम दुबे बाद

चेन्नईला पाचवा धक्का बसला आहे. महत्वाचा फलंदाज शिवम दुबे बाद झाला आहे. 

चेन्नईला तिसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

चेन्नईचा अजिंक्य रहाणे बाद झाला आहे. रहाणेने 22 चेंडूत 33 धावा केल्या.

7 षटकात चेन्नईची धावसंख्या 64/2

चेन्नईने 7 षटकात 2 विकेट्स गमावत 64 धावा केल्या आहेत.

चेन्नईला दुसरा धक्का

चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. मचेल झेलबाद झाला. त्याने 6 चेंडूत 4 धावा केल्या.

पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद

मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नईचा कर्णधार 0 धावांवर बाद झाला.

चेन्नईला विजयासाठी 219 धावांचं आव्हान

आरसीबीने 20 षटकांत 218 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी 219 धावा करणं आवश्यक असणार आहे.

विराट कोहलीचा भीमपराक्रम

आरसीबीची तुफान फटकेबाजी

आरसीबीची तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. रजत पाटीदार आणि कॅमरॉन ग्रीन सध्या फलंदाजी करत आहे. 17.3 षटकात आरसीबीची धावसंख्या 182/2 अशी आहे.

सिमरजीतच्या षटकात 19 धावा

सिमरजीत सिंगने 14 वे षटक टाकले. या षटकात एकूण 19 धावा झाल्या. 14 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा आहे. रजत पाटीदार 13 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर कॅमेरून ग्रीन तीन चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.

5 षटकात 37 धावा

आरसीबीने 5 षटकात 37 धावा केल्या आहेत.

सामन्याला पुन्हा सुरुवात

पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे.

बंगळुरु अन् चेन्नईच्या सामन्यात पाऊस आला धावून

बंगळुरु आणि चेन्नईचा सामना सध्या सुरु आहे. 3 षटकांत आरसीबीने 31 धावा केल्या. मात्र यानंतर मैदानात पावसाला सुरुवात झाली. 

बंगळुरुविरुद्ध चेन्नई प्रथम गोलंदाजी करणार

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

CSK आणि RCB हेड टू हेड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं  21 वेळा विजय मिळवला तर  10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे. एका मॅचचा निकाल लागू शकला नाही.  

पिच रिपोर्ट

एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये पिच बॅटिंगसाठी फायदेशीर ठरते. हैदराबादनं या मैदानावर 287 धावांची खेळी केली होती. आरसीबीनं त्याचा पाठलाग करताना 262 धावा केल्या होत्या. ड्यूच्या कारणामुळं टॉस जिंकणारा कॅप्टन पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेऊ शकतो.

बंगळुरु आजच्या सामन्यासाठी सज्ज

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यासाठी एमएस धोनी सज्ज

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी आमने सामने

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी आज पुन्हा एकदा आमने सामने येतील. 

Ruturaj Gaikwad : चेन्नई ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात प्लेऑफमध्ये जाणार?

चेन्नई सुपर किंग्ज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात प्ले ऑफच्या शर्यतीत पोहोचणार की नाही हे आजच्या मॅचच्या निकालावरुन ठरेल.

CSK vs RCB Head To Head : चेन्नई की बंगळुरु? कोण कुणाला वरचढ ठरलंय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं  21 वेळा विजय मिळवला तर  10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे. 

CSK : चेन्नईचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर, एका विजयाची गरज

चेन्नईचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर असून त्यांना केवळ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवण्याची गरज आहे.

CSK vs RCB : चेन्नई आणि बंगळुरु आमने सामने

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. 

पार्श्वभूमी

CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates  in Marathi: आज आयपीएलमध्ये फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु होम ग्राऊंडवर ऋतुराज गायकावड याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज   यांच्याशी लढणार आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरुसाठी आजची मॅच महत्त्वाची आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.