MI vs DC : अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, पृथ्वी-स्टब्सची अर्धशतकं व्यर्थ
Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्सनं अखेर पहिला विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सवर मुंबईनं 29 धावांनी विजय मिळवला.
![MI vs DC : अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, पृथ्वी-स्टब्सची अर्धशतकं व्यर्थ ipl 2024 mi vs dc mumbai indians won first match against delhi capitals with 29 runs MI vs DC : अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, पृथ्वी-स्टब्सची अर्धशतकं व्यर्थ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/07/fd7079096a3c8358f5a1b2bb0d5df34e1712497371446989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई इंडियन्सनं(Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला आहे. पहिल्या तीन मॅचमधील पराभवानंतर होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सनला पहिला विजय मिळाला आहे. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 विकेटवर 234 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 205 इतक्या धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय मिळवला.
दिल्लीचं नेमकं काय चुकलं?
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय दिल्लीच्या अंगलट आला. दिल्लीपुढं मुंबई इंडियन्सनं 5 विकेटवर 234 धावांचं आव्हान ठेवलं. मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ पंतचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अभिषेक पोरेलला पाठवण्याचा निर्णय देखील चुकला. अभिषेक पोरेलनं 41 धावा केल्या मात्र त्याचं स्ट्राइक रेट जसं हवं होतं तसं नव्हतं. दिल्लीकडून पृथ्वी शॉनं 66 धावा केल्या. तर, स्टब्सनं 25 बॉलमध्ये 71 धावा केल्या. दिल्लीचे इतर फलंदाज मात्र चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
मुंबई इंडियन्सला पहिला विजय
मुबंई इंडियन्सनं आज पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 विकेटवर 234 धावा केल्या. मुंबईच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्मा आणि इशान किशननं 80 धावांची सलामीची भागिदारी केली. रोहित शर्माला अक्षर पटेलनं 49 धावांवर बाद केलं. यानंतर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. इशान किशनला देखील अक्षर पटेलनं बाद केलं. इशान किशननं 42 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हिडनं मुंबईचा डाव सावरला. हार्दिक पांड्यानं 39 धावा केल्या तर टीम डेव्हिडनं 45 धावा केल्या.
मुंबईकडून पहिली मॅच खेळणाऱ्या रोमारियो शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. शेफर्डनं 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या जोरावर मुंबईला 234 धावांपर्यंत पोहोचवलं. शेफर्डनं 20 ओव्हरमध्ये 32 धावा काढल्या. शेफर्डनं 20 व्या ओव्हरमध्ये नॉर्खियाला 32 धावा काढल्या. त्याच 32 धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी महागात पडल्या. दिल्लीचा 29 धावांनी पराभव झाला.
मुंबई इंडियन्स विजयाचं खातं उघडलं
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाची प्रतीक्षा होती. अखेर मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवला आहे. मुंबईनं पहिला विजय मिळवला असून आता त्यांचा सामना दोन बलाढ्य संघांसोबत होणार आहे. 11 एप्रिलल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशी मॅच होईल. तर, 14 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येतील.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)