SRH vs LSG Live Score, IPL 2024 : सनरायजर्स हैदराबाद अन् लखनौ सुपर जाएंटस आमने सामने, प्ले ऑफचं तिकिट कुणाला?

SRH vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएलमध्ये आज 57 वी लढत सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 08 May 2024 10:15 PM
हैदराहादचा सर्वात मोठा विजय

हैदराबादने लखनौचा 10 षटके आणि 10 विकेट राखून लखनौचा दारुण पराभव केला.

कांडका पाडला

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं लखनौचा कांडका पाडला... 7.5 षटकात 137 धावांचा पाऊस

हैदराबादची वादळी सुरुवात

हैदराबादची वादळी सुरुवात... हेड आणि शर्माचनं चोपलं..... हेडने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले

लखनौची 167 धावांपर्यंत मजल

आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांच्या वादळी पलंदाजीच्या जोरावर लखनौने 165 धावांपर्यंत मजल मारली

पूरन-बडोनीनं लखनौचा डाव सावरला

पूरन-बडोनीनं लखनौचा डाव सावरला.... लखनौ 4 बाद 128 धावा

लखनौला दुसरा धक्का

मार्कस स्टॉयनिस बाद... लखनौला दुसरा धक्का.. भुवनेश्वर कुमारने तीन धावांवर पाठवलं तंबूत

लखनौला पहिला धक्का

क्विंटन डि कॉकच्या रुपाने लखनौला पहिला धक्का बसलाय. पॅट कमिन्सच्या चेंडूवर डि कॉक बाद झालाय.

सनराइजर्स हैदराबादची प्लेईंग 11 -

ट्रेविस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, पैट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन

लखनौच्या ताफ्यात कोण कोण

 क्विंटन डिकॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, यश ठाकुर, रवि बिश्नोई आणि नवीन-उल-हक. 

SRH vs LSG Live Updates : सनरायजर्स हैदराबादला फलंदाजांच्या फॉर्मची चिंता

सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली खेळी करण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

तिसऱ्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये लढत 

सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्याकडे सध्या 12 गुण आहेत. जो संघ विजय मिळवेल त्याचं तिसरं स्थान पक्क होणार आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज नेट रनरेटच्या आधारे तिसऱ्या स्थानावर आहे.

आजच्या मॅचवर पावसाचं सावट

लखनौ सुपर जाएंटस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचवर पावसाचं सावट  आहे. काल हैदराबादमध्ये जोरदार पाऊस पडला. 

SRH vs LSG Live Updates : प्ले ऑफच्या दृष्टीनं महत्त्वाची लढत 

सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यातील आजची मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

पार्श्वभूमी

SRH vs LSG Live Score Updates हैदराबाद : आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदरबाद आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यासाठी प्लेऑफच्या दृष्टीनं आजची मॅच महत्त्वाची आहे. लखनौ आणि सनरायजर्स हैदराबादचे गुण सारखेच असून गुणतालिकेत हैदराबाद चौथ्या स्थानावर तर लखनौ सहाव्या स्थानावर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.