IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, सामन्याचा संक्षिप्त आढावा

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 24 Mar 2024 11:20 PM
मुंबईचा पराभव

अटीतटीच्या सामन्यात गुजरातनं मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. मुंबईच्या पराभवाची परंपरा कायम... 

पियूष चावलाही बाद

हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही बाद झालाय. मुंबईला दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज 

हार्दिक पांड्याही बाद

6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने षटकार आणि चौकार मारत सामना फिरवला होता. पण अनुभवी उमेश यादव यानं पुढच्या चेंडूवर हार्दिक पांड्याला बाद केले. मुंबईला विजयासाठी 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज

मुंबईला सातवा धक्का

मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी... लागोपाठ गमावल्या विकेट... कोईत्जेही बाद.. सर्व मदार हार्दिक पांड्यावर

मुंबईला आणखी एक धक्का

मोक्याच्या क्षणी मुंबईने लागोपाठ विकेट फेकल्या. तिलक वर्मा 25 धावांवर बाद... मुंबईला विजयासाठी 21 धावांची गरज

मोक्याच्या क्षणी मुंबईला झटका

मोक्याच्या क्षणी मोहित शर्माने तिलक वर्माला बाद केले.  डेविड मिलरनं घेतला शानदार झेल. मुंबईला विजयासाठी 12 चेंडूत 29 धावांची गरज

IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबईला चौथा धक्का

IPL 2024 GT vs MI LIVE Score:  मोहित शर्माने डेवॉल्ड ब्रेविसला केले बाद.. मुंबईला बसला चौथा धक्का... ब्रेविसनं 38 चेंडूत केल्या 46 धावा

विजय मुंबईच्या दृष्टीक्षेपात

गुजरातनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ तीन बाद 126 धावांपर्यंत पोहचला आहे. मुंबईला विजयासाठी 31 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे.

IPL 2024 GT vs MI LIVE Score: रोहित शर्माची आक्रमक फलंदाजी

 


IPL 2024 GT vs MI LIVE Score: रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. रोहित शर्माने 29 चेंडूमध्ये 43 धावांचं योगदान दिलं. या खेळीला एक षटकार आणि सात चौकारांचा साज होता. 

IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबईला दुसरा धक्का, नमन धीर बाद

 IPL 2024 GT vs MI LIVE Score: उमरजई यानं मुंबईला दिला दुसरा धक्का.. नमन धीर याला 10 चेंडूत 20 धावा काढून बाद...  मुंबईची अतिशय खराब सुरुवात झाली आहे. 

IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबईची खराब सुरुवात, ईशान किशन बाद

 


ओमरजईनं आयपीएलची पहिली विकेट घेतली. ओमरजईने ईशान किशनला शून्यावर पाठवलं तंबूत. 

IPL 2024 GT vs MI : बूम बूम बुमराहपुढे गुजरातचं लोटांगण, मुंबईनं 168 धावांमध्ये रोखलं

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: जसप्रीत बुमराहच्या (jasprit Bumrah) भेदक माऱ्यापुढे गुजरातच्या (GT) फलंदाजांनी लोटांगण घातलं. बूम बूम बुमराहनं गुजरातच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. अहमदाबादच्या मैदानात गुजरातच्या संघाने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 168 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून साई सुदर्शन यानं सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. बुमराह आणि गेराल्ड कोइत्जे यांनी गुजरातच्या (Gujarat Titans vs Mumbai) फलंदाजांना रोखलं. 

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातला सहावा धक्का

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:   नमन धीर यानं शानदार झेल घेत तेवातियाचा डाव संपला. गुजरातला सहावा धक्का... 

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातचा अर्धा संघ तंबूत, बुमराहचा भेदक मारा

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:   जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी ढेपाळली आहे. दोन्ही जम बसलेले फलंदाज माघारी परतले. आधी डेविड मिलर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनही बाद झाला. साई सुदर्शन यानं 45 धावांची अश्वासक खेळी केली. जसप्रीत बुमराहने तिसरी विकेट घेतली.

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातला चौथा धक्का, मिलर बाद

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  जसप्रीत बुमराहाला मोठा फटका मारण्याच्या नादात मिलर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यानं घेतला झेल. डेविड मिलर 12 धावांवर बाद झाला. गुजरात 4 बाद 134 धावा

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातला तिसरा धक्का

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  कोइत्जेनं मुंबईला तिसरी विकेट मिळवून दिली. उमरजई याला 17 धावांवर बाद केले. कोइत्जेनं मिळवली आयपीएलमधील पहिली विकेट. गुजरात 12 षटकानंतर तीन बाद 104 धावा. 

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातला मोठा धक्का, गिल तंबूत

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  गुजरातचा कर्णधार शुभमन गिल पियुष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित शर्मानं घेतला शानदार झेले. शुभमन गिल 22 चेंडूत 31 धावा काढून बाद झाला.  गुजरात दोन बाद 64 धावा

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातची सावध सुरुवात - 

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:   प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सावध सुरुवात केली. शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी गुजरातला वेगवान सुरुवात दिली. चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहनं साहाला तंबूत पाठवलं. सहा षटकानंतर गुजरात 1 बाद 47 धावा.

IPL 2024 GT vs MI LIVE Score: बूम बूम बुमराह... गुजरातला पहिला धक्का

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:   जसप्रीत बुमराहच्या शानदार यॉर्करपुढे वृद्धीमान साहा अडखला. साहाचा त्रिफाळा उडाला. जसप्रीत बुमराहने साहाला 19 धावांवर बाद केले. गुजरात 4 षटकानंतर एक बाद 31 धावा



IPL 2024 GT vs MI LIVE Score: हार्दिकची गोलंदाजी फोडली

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये गुजरातनं 20 धावा वसूल केल्या आहेत. तीन षटकानंतर गुजरात बिनबाद 27 धावा

IPL 2024 GT vs MI LIVE Score: सामन्याला सुरुवात

 IPL 2024 GT vs MI LIVE Score: हार्दिक पांड्या पहिलं षटक घेऊन आला. तर गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी डावाची सुरुवात केली.

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरातच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?

 IPL 2024 GT vs MI LIVE Score: वृद्धीमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, अजमतुल्ह ओमरजई, राशीद खान, उमेश यादव, साई किशोर, स्पेन्सर जॉनसन


राखीव खेळाडू - बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, अभिनव मनोहर, नूर अहमद


Gujarat Titans: Wriddhiman Saha, Shubman Gill, Sai Sudharsan, Vijay Shankar, David Miller, Rahul Tewatia, Azmatullah Omarzai, Rashid Khan, Umesh Yadav, Sai Kishore, Spencer Johnson
Subs: BR Sharath, Mohit Sharma, Manav Suthar, Abhinav Manohar, Noor Ahmad

IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कोण कोण ?

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  रोहित शर्मा, ईशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, लूक वूड


राखीव खेळाडू - डेवॉल्ड ब्रेविस, आर. शेफर्ड, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  हार्दिकनं पांड्यानं नाणेफेक जिंकली

 IPL 2024 GT vs MI LIVE Score:  हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यजमान गुजरात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार

हार्दिक-रोहित एकत्र खेळणार

IPL 2024 GT vs MI LIVE Score: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

IPL 2024 GT vs MI LIVE Score: गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल नाणेफेकीसाठी मैदानावर आले आहेत.

मुंबई इंडियन्स पूर्ण तयारीसह मैदानात उतरणार

आयपीएलमधील आपल्या पहिल्या लढतीसाठी मुंबई इंडियन्सची टीम सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्सचा यावेळी विजेतेपदाचा  दुष्काळ संपवण्याचा निर्धार असेल. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. मुंबईनं 2020 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर गेल्या तीन आयपीएल स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक झालेली नव्हती. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं यावेळी नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय घेत हार्दिक पांड्याला गुजरा टायटन्समधून परत आपल्या संघात घेतलं आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आता आयपीएलमध्ये खेळणार आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत होणार आहे. शुभमन गिल (shubman gill ) गुजरातचं तर हार्दिक पांड्या (hardik pandya ) मुंबईचं नेतृत्व करत आहे. हा सामना जिंकून यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.