IPL 2024 DC vs RR: आज दिल्ली कॅपिटल्स अन् राजस्थान रॉयल्सचा होणार सामना

IPL 2024 DC vs RR: गुणतालिकेत दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर असून राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

मुकेश चव्हाण Last Updated: 07 May 2024 11:30 PM
दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत,

राजस्थानचा 20 धावांनी पराभव, संजूची वादळी खेळी व्यर्थ

राजस्थानला मोठा धक्का

मोक्याच्या क्षणी रोवमन पॉवेल बाद... आता चार चेंडूत 28 धावांची गरज

अश्विनचा पत्ता कट

कुलदीपने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट.. अश्विन बाद

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत 

 


कुलदीप यादवने Donovan Ferreira याला स्वस्तात तंबूत धाडले.

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत, शुभम दुबे मोक्याच्या क्षणी बाद

सामना रोमांचक स्थितीत

राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचला आहे. राजस्थानला 21 चेंडूत 42 धावांची गरज आहे.

राजस्थानला तिसरा धक्का

यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर याच्यानंतर राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे.  रियान पराग 26 धावा काढून बाद झाला.

राजस्थानला पहिला धक्का 

 


यशस्वी जायस्वालच्या रुपाने राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. खलील अहमद यानं यशस्वीला केले बाद

दिल्लीची 220 धावांपर्यंत मजल

दिल्लीची 220 धावांपर्यंत मजल, राजस्थानला 221 धावांची गरज

दिल्लीला सातवा धक्का

स्टब्स 41 धावांवर बाद झालाय. दिल्लीला सातवा धक्का बसलाय.

दिल्लीला सहावा धक्का

गुलबदीन नईबच्या रुपाने दिल्लीला सहावा धक्का... 

IPL 2024 DC vs RR : कर्णधार ऋषभ पंत 15 धावांवर माघारी

IPL 2024 DC vs RR Live Score : दिल्लीला 10 व्या षटकात अक्षर पटेलच्या नावाने तिसरा धक्का बसला. यानंतर 12 व्या षटकात अभिषेक पोरेल 65 धावांची खेळी करुन बाद झाला, तर 14 व्या षटकात कर्णधार ऋषभ पंत 15 धावांवर माघारी परतला.

14 व्या षटकापर्यंत दिल्लीला पाच धक्के

14 व्या षटकापर्यंत दिल्लीला पाच धक्के बसले आहेत. सध्या संघाची धावसंख्या पाच गडी बाद 151 धावा आहे.

दिल्लीला दुसरा धक्का

शाय होपच्या रुपाने दिल्लीला दुसरा धक्का बसलाय

दिल्लीला पहिला धक्का

अर्धशतकानंतर मॅकगर्क बाद... अश्विनने घेतली विकेट... 

मॅकगर्कची वादळी फलंदाजी

जेक मॅकगर्क यानं आवेश खानची गोलंदाजी फाडून काढली. एकाच षटकात 28 धावा चोपल्या. त्यानं अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. दिल्ली 4 षटकानंतर बिनबाद 59 धावा

दिल्लीची वेगवान सुरुवात

जेक मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीला वेगवान सुरुवात करुन दिली आहे. दिल्लीने 2.5 षटकात बिनबाद 30 धावा चोपल्यात.

दिल्लीच्या ताफ्यात कोणते 11 खेळाडू ?

जेक प्रेसर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), गुलबदीन नईब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद


राखीव खेळाडू - सलाम, कुमार कुशाग्र, प्रवीन, सुमीत आणि ललीत


DC: 1 Jake Fraser-McGurk, 2 Abishek Porel, 3 Shai Hope, 4 Tristan Stubbs, 5 Rishabh Pant (capt, wk), 6 Gulbadin Naib, 7 Axar Patel 8 Kuldeep Yadav, 9 Mukesh Kumar, 10 Ishant Sharma, 11 Khaleel Ahmed.


 Impact Subs: Salam, Kushagra, Praveen, Sumit and Lalit

राजस्थान अन् दिल्लीच्या संघात महत्वाचे बदल

राजस्थानच्या संघात दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहे. ध्रुव जुरेल आणि शिमरोन हेटमायर दुखापतग्रस्त झाले आहेत, त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये नाहीत. त्यांच्या जागी राजस्थानच्या संघात शुभम दुबे आणि डेनवोन फरेरा यांना स्थान दिलेय. दुसरीकडे दिल्लीच्या ताफ्यातही बदल करण्यात आला आहे. ईशांत शर्मा, गुलबदीन नईब यांना संधी मिळाली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण?

यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल


राखीव खेळाडू - जोस बटलर, कुलदीप सेन, कोटियन, राठोड

राजस्थानने नाणेफेक जिंकली

संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (w/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, ललित यादव, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, डेव्हिड वॉर्नर, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा, झ्ये रिचर्डसन, रिकी भुई, लिझाद विल्यम्स, इशांत शर्मा, गुलबदिन नायब

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, तनुष कोटियन, नवदीप सैनी, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर

पार्श्वभूमी

IPL 2024 Delhi Capitals vs Rajasthan Royals: आज दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (RR) सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर असून राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.