Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यातपैकी तब्बल 132 जागांवर भाजपने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला. राज्यभरात महायुतील एकूण 232 जागा मिळल्या. तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले.
महायुतीच्या या यशानंतर काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा ऐतिहासिक विजय आहे, आजपर्यंत अनेक निवडणूका पाहिल्या मात्र ही निवडणूक जनतेनी हातात घेतली. लोकांनी मतांच्या स्वरुपातून प्रेमाचा वर्षावर केला. अटलसेतू, समृद्धी, कारशेडचं उद्घाटन केलं. विकासाला आम्ही प्राधान्य दिलं, कामाला प्राथमिकता दिली. राज्याच विकास करताना सर्व घटकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं, असंही एकनाथ शिदेंनी सांगितले.
राज्यशासन घरात बसून चालवता येत नाही- एकनाथ शिंदे
लोकसभेला लोकांच्या दारात जाऊन म्हणाले तरी नरेंद्र मोदी सत्तेत आले. जनतेने आता स्पष्ट कौल दिला. काही लोक दररोज सरकार पडणार हेच बोलयचे आम्ही आरोपांना आरोपांतून उत्तर न देता कामातून दिलं, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. मी लोकांमध्ये जायचो, दोन्ही उपमुख्यमंत्री २४×७ काम करतो. राज्यशासन घरात बसून चालवता येत नाही. 2019 ला जे सरकार यायला हवे होतं ते आलं नाही, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे-
महायुतीच्या या पत्रकार परिषदेत एक मजेशीर किस्सा देखील घडला. एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत असताना सरकार कोणाचं हे जनतेनं ठरवलं आहे. राष्ट्रवादी कोणाची हे देखील ठरवलं...(अजितदादांकडे बघून) असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर शिवसेना कोणाची हेही जनतेने ठरवले, असं अजित पवार म्हणाले. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.