एक्स्प्लोर

धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीची पुन्हा एकदा हुलकावणी

IPL 2023, Virat kohli : धावांची इतकी मोठी लूट करुनही  या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.

IPL 2023, Virat kohli :  108 कसोटी सामन्यात 48.93 च्या सरासरीने 28 शतकांसह 8416  धावा... २७४ वनडे सामन्यात ५७.३२ च्या सरासरीने ४६ शतकांसह १२८९८ रन्स.. याशिवाय २३७ आयपीएल सामने ७२६३ रन्स, ज्यामध्ये सात शतकं  आणि स्ट्राईक रेट १३० चा... ही अचंबित करणारी आकडेवारी आहे द विराट कोहलीची. धावांची इतकी मोठी लूट करुनही  या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.

बंगळुरुच्या मैदानात कोहलीने  रविवारी या हंगामातलं सलग दुसरं शतक ठोकलं आणि प्ले-ऑफच्या आशा पल्लवित केल्या.  पण, शुभमन गिलने त्याला शतकी प्रत्युत्तर देत गुजरातला विजयपथावर नेलं आणि कोहलीच्या टीमसाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद केला. ७५ आंतरराष्ट्रीय शतके २५ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार त्याशिवाय असे विक्रमांचे महाल रचणाऱ्या कोहलीच्या बंगळुरु टीमने आतापर्यंत तीनदा फायनल गाठलीय तर आणखी पाचदा प्ले-ऑफचं तिकीट मिळवलंय. तरीही आरसीबीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न १६ मोसमांतनंतरही सत्यात उतरलेलं नाही.

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची बॅटिंग जोरात असल्याने कोहलीच्या आरसीबीसाठी मग मिम्स फिरले नाही तरच नवल. यंदाच्या मोसमात एका मॅचमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा झालेला वादही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला. कोहली क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये तितक्याच आक्रमकपणे आणि झोकून देत खेळत असतो. आयपीएलची ही निराशा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात नक्कीच असणार आहे. तरीही जूनच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी त्याने बॅटला धावांची धार काढल्याने टीम इंडियासाठी ही नक्कीच सुखावह बाब म्हणावी लागेल. फक्त ती आयपीएलची ट्रॉफी जोपर्यंत त्याला मिळत नाही... तोवर त्याचे फॅन्स म्हणत राहीतल... कब खौलेगा रे खून तेरा... माँ का बाप का भाई का... सबका बदला लेगा तेरा फैजल

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget