एक्स्प्लोर

IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर, स्पर्धेत भारतीय कुठे? जाणून घ्या सविस्तर

IPL 2023 : गुजरात आणि दिल्लीच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. त्याशिवाय पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेतही मोठा बदल पाहायला मिळाला.

IPL 2023 : गुजरात आणि दिल्लीच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. त्याशिवाय पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेतही मोठा बदल पाहायला मिळाला. मोहम्मद शामी पर्रल कॅपच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत चौथ्या स्थानावर पोहचलाय. विराट कोहली टॉप पाचमधून बाहेर गेलाय. पाहूयात पर्पल आणि ऑरेंज कॅपमध्ये कण कोण स्पर्धेत आहे... 

पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये भारतीयांचा दबदबा आहे. दोन्हीकडे आघाडीच्या पाच खेळाडूत तीन भारतीय खेळाडू दिसत आहेत. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन आणि तिलक वर्मा आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये आहेत. तर गोलंदाजीत मोहम्मद शामी, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल आघाडीच्या पाच गोलंदाजात आहेत. 


ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर, रेसमध्ये कोण कोण कोण

पहिल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक खेळी केली. दोन्ही सामन्यात ऋतुराजने अर्धशथके लगावली आहेत. पहिल्या सामन्यात ऋतुराजने ९२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर लखनौविरोधातही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज गायकवाड याने दोन सामन्यात १४९ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो. २०२१ मध्ये ऋतुराजने ऑऱेंज कॅप जिंकली होती. सध्या ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर आहे.  

दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा काइल मायर्स आहे.. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली होती. दोन सामन्यात मायर्स याने १२६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नर याने दोन सामन्यात ९३ धावा चोपल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर साई सुदर्शन याने झेप घेतली आहे. साई सुदर्शन याने दोन सामन्यात ८४ धावा चोपल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर मुंबईचा तिलक वर्मा आहे. तिलक वर्माने पहिल्याच सामन्यात ८४ धावांची खेळी केली होती.  या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने मुंबईविरोधात ८२ धावांची खेळी केली होती. तर सातव्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. डु प्लेसिसने पहिल्याच डावात ७३ धावांची खेळी केली होती. 

गोलंदाजीत मार्क वूडचा दबदबा...
लखनौचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डोक्यावर सध्या पर्पल कॅप आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातच्या मोहम्मद शामीने झेप घेतली आहे. दोन सामन्यात पाच विकेट घेत शामीने दुसरे स्थान मिळवलेय. तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे. राशिद खान यानेही दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर लखनौचा रवि बिश्नोई आहे. बिश्नोईने आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने एका डावात चार विकेट घेतल्या आहेत.  चेन्नई सुपर किंग्सचा मोईन अलीही या स्पर्धेत आहे. मोईन अलीने दोन सामन्यातील एका डावात गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या आहेत.  पंजाबच्या अर्शदीप याने एका सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. तोही पर्पल कॅपच्या स्पर्धेत येऊ शकतो.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Playoffs Scenario : फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
MS Dhoni IPL 2026 : CSK ला प्लेऑफमध्ये जाण्याची अजूनही संधी, पण MS धोनी संघाला सोडून घरी निघून गेला, चेन्नईच्या ताफ्यात काय घडलं?
CSK ला प्लेऑफमध्ये जाण्याची अजूनही संधी, पण MS धोनी संघाला सोडून घरी निघून गेला, चेन्नईच्या ताफ्यात काय घडलं?
Hardik Pandya Fined : मैदानावर जे घडलं कॅमेऱ्यात ते सगळं कैद झालं! हार्दिक पांड्यावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं कोणत्या चुकीची मिळाली शिक्षा?
मैदानावर जे घडलं कॅमेऱ्यात ते सगळं कैद झालं! हार्दिक पांड्यावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं कोणत्या चुकीची मिळाली शिक्षा?
IPL Playoff Scenario 2026: मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
Embed widget