SRH vs RR Live Score, IPL 2023 : हैदराबादचा 72 धावांनी पराभव

SRH vs RR, IPL 2023 Live : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात आज सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. 

नामदेव कुंभार Last Updated: 02 Apr 2023 07:24 PM
हैदराबादचा 72 धावांनी पराभव

युजवेंद्र चहल आणि बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचा संघ 131 धावांपर्यंत पोहचला. राजस्थानने हा सामना 72 धावांनी जिंकला.

हैदराबादला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार बाद

हैदराबादला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार बाद.. चहलची चौथी विकेट

हैदराबादला सातवा धक्का

हैदराबादला सातवा धक्का, अदिल रशिद 18 धावांवर बाद

हैदराबादला सहावा धक्का, मयांक अग्रवाल 27 धावावर बाद

हैदराबादला सहावा धक्का, मयांक अग्रवाल 27 धावावर बाद

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत, राजस्थानची विजयाकडे वाटचाल 







204 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. 48 धावांत हैदराबादचे पाच फलंदाज तंबूत परतलेत. मयांक अग्रवाल 25 धावांवर खेळत आहे. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडता आले नाही. तर हॅरी ब्रूक 13, वॉशिंगट सूंदर 1 आणि ग्लेन फिलिप्स 8 धावांवर तंबूत परतले. 


हैदराबादला तिसरा धक्का, हॅरी ब्रूक बाद







युजवेंद्र चहलने हैदराबादला तिसरा धक्का दिला. हॅरी ब्रूक बाद


बोल्टचे हैदराबादला दोन धक्के, अभिषेक शर्मा-त्रिपाठी तंबूत

ट्रेंट बोल्ट याने हैदराबादला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी स्वस्तात माघारी परतले. तीन षटकानंतर हैदराबाद दोन बाद 12 धावा

राजस्थानचा 203 धावांचा डोंगर

IPL 2023, SRH vs RR: जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 204 धावांची गरज आहे.

संजू सॅमसन बाद, मोक्याच्या क्षणी राजस्थानला चौथा धक्का

नटराजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन झेलबाद झाला. 

उमरानच्या वेगापुढे देवदत्त पडिक्कल फसला

उमरान मलिक याने देवदत्त पडिक्कल याला त्रिफाळाचीत करत राजस्थानला तिसरा धक्का दिला. पडिक्कल दोन धावा काढून बाद झाला. 

राजस्थानला दुसरा धक्का, यशस्वी जायस्वाल बाद

फारुकीने राजस्थानला दुसरा धक्का दिला.. आधी जोस बटलर याला बाद केले होते. आता यशस्वी जायस्वाल याला तंबूचा रस्ता दाखवला

यशस्वी जायस्वलचे अर्धशतक

युवा यशस्वी जयस्वाल याने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.  राजस्थान 12 षटकानंतर एक बाद 135 धावा

बटलरनंतर संजूचे तुफान

जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. संजू सॅमसन 12 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. राजस्थान संघाने 10 षटकात 127 धावा केल्या आहेत. 

राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर बाद

राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर बाद.. फारुखीने बटलरला त्रिफाळाचीत केले... बटलर 54 धावा काढून बाद झाला.

जिथे सोडले तिथूनच सुरुवात.... बटलरची विस्फोटक फलंदाजी

गेल्या हंगामात जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. गेल्या हंगामात जिथे सोडले तिथूनच त्याने फलंदाजीला सुरुवात केल्याचे दिसेतय. जोस बटलर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. राजस्थान संघाने 5.3 षटकात 81 धावा केल्या आहेत..

बटलर-यशस्वीची फटकेबाजी

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी विस्फोटक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. 

सामन्याला सुरुवात

राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वाल मैदानात तर हैदराबादकडून पहिले षटका भुवनेश्वर कुमार याच्याकडे

हैदराबादसोबत भुवनेश्वर कुमारची दहा वर्ष पूर्ण

Sunrisers Hyderabad XI, हैदराबाद संघाची प्लेईंग 11 - 

अभिषेक शर्मा, मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी,  भुवनेश्वर कुमार (कर्णधार) हॅरी ब्रूक, फारुकी, ग्लेन फिलिप्स (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक, टी नटराजन आणि आदिल रशीद

राजस्थान संघाची प्लेईंग 11 - 

जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकिपर), रियान पराग, आर, अश्विन, युजवेंद्र चहल
,केएम आसिफ, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेन्ट बोल्ट

हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानची प्रथम फलंदाजी आहे. 

कशी आहे खेळपट्टी?

हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) रविवारी (2 एप्रिल) रोजी सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. राजस्थान संजू सॅमसनच्या तर हैदराबाद भूवनेश्वर कुमारच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. 


राजस्थानचा संघ संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जोस बटलरवर (Jos Buttler) मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल, तर हैदराबादला मयंका अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. हैदराबाद संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले संतुलन आहे. 


हैदराबादची धुरा भुवनेश्ववरच्या खांद्यावर
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर सोपवण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार याने याआधीही हैदराबाद संघाने नेतृत्व केलेय. मार्करम सध्या नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार भुवनेश्वर कुमार असेल. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा ही जोडी सलामीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हैदराबादकडे मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार हे भारतीय खेळाडू आहेत. टी नटराजनही दुखापतीनंतर परतला असल्यामुळे डेथ-ओव्हरची समस्या सुटली पाहिजे.


राजस्थान संघाची परिस्थिती काय?
राजस्थान रॉयल्सकडे यशस्वी जैस्वाल (Yashaswi Jaiswal) आणि जोस बटलर (Jos Buttler) हे दोन उत्तम सलामीवीर आहेत. शिवाय देवदत्त पडिक्कलचाही (Devdutt Padikkal) संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सलामी जोडी कोणती ठरतेय हे पाहावं लागेल. मात्र, यशस्वी आणि बटलर सलामीसाठी उतरण्याची शक्यता जास्त आहे. देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर तर संजू सॅमसन (Sanju Samson) चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो.


राजस्थान संघाकडे मधल्या फळीत शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), जिमी नीशम (Jimmy Neesham) आणि रियान परागसारखे (Riyan Parag) खेळाडू आहेत. तसेच, आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यामुळे राजस्थानची गोलंदाजी तगडी आहे. हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीसाठी ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्ण साथीला आहेत.


RR vs SRH Pitch Report : कशी आहे खेळपट्टी?


हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.