IPL 2023 Ishan Kishan : ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण, दिग्गजांच्या यादीत सहाव्या स्थानी
Ishan Kishan 4000 Runs in T20 : आयपीएल 2023 मध्ये ईशान किशनने मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या. तो सर्वात जलद ही कामगिरी करणारा सहावा क्रिकेटपटू आहे.
Ishan Kishan 4000 Runs in T20 : क्रिकेटपटू ईशान किशन (Ishan Kishan) त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा विक्रम केला आहे. ईशान किशनने टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करणारा ईशान सहावा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ईशान किशनने मंगळवारी, 18 एप्रिलला हैदराबाद (IPL 2023 MI vs SRH) विरुद्धच्या सामन्यात खेळताना हा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जलद 4000 टी20 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
IPL 2023 Ishan Kishan : ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (MI) सामन्यात डावखुरा फलंदाज ईशान किशनने हा पराक्रम नोंदवला. आयपीलएल 2023 मधील मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना विशेष कामगिरी केली. हैदराबादविरुद्ध त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या. यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या.
Ishan's T20 milestone captured in 𝟰🅺. 😎💙#OneFamily #SRHvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ishankishan51 pic.twitter.com/G2wFgUxs37
— Mumbai Indians (@mipaltan) April 19, 2023
टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण
ईशान किशनने 149 डावात 4007 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात जलद 4000 धावा करणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ईशान किशनने आतापर्यंत 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यामध्ये 653 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चार वेळा दमदार अर्धशतकी खेळीही केली आहे.
सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज (कमी सामन्यांमध्ये) :
केएल राहुल : 117 सामने
विराट कोहली : 138
सुरेश रैना : 143
ऋषभ पंत : 147
श्रेयस अय्यर : 147
ईशान किशन : 149
T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारे भारतीय खेळाडू
टी-20 मध्ये 4000 हून अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, केएल राहुल, मनीष पांडे, गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव, अंबाती रायुडू, संजू सॅमसन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, युवराज सिंह, युवराज पाटील. , ऋषभ पंत, पार्थिव पटेल, मुरली विजय, वृद्धिमान साहा, वीरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्या आणि नितीश राणा हे इतर भारतीय फलंदाज आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :