एक्स्प्लोर

IPL 2023 : राजस्थानचा हल्ला बोल, हैदराबादच्या नवाबांचा 72 धावांनी पराभव

SRH vs RR : राजस्थानने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. हैदराबादला पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागलाय.

SRH vs RR, Match Highlight : राजस्थानने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव केला. संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीनंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यजुवेंद्र चहलने चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 131 धावांपर्यंत पोहचला.

उमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्या फलंदाजीमुळे हैदराबदाच्या संघाने 100 धावसंख्या ओलांडली.  अबुद्ल समद याने नाबाद 32 धावांची खेळी केली. तर उमरान मलिक याने 19 धावांचे योगदान दिले. समदचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 ची धावसंख्या ओलांडता आली नाही. 

हैदराबादच्या नवाबांची शरणागती - 

राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. शून्य धावसंख्या असताना हैदराबादचे दोन फलंदाज बाद झाले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडता आले नाही. 50 धावांच्या आत अर्धा हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मयांक अग्रवाल 27, हॅरू ब्रूक 13, वॉशिंगटन सूंदर 1, ग्लेन फिलिप्स 8 आणि अदिल रशिद 18 यांना मोठी खेळी करता आली नाही. 

बोल्टचा भेदक मारा -  

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याने भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडू दिले नाही. बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे दोन्ही फलंदाजांनी नांगी टाकली.  अभिषेक शर्मा त्रिफाळाचीत बाद झाला. तर राहुल त्रिपाठीलाही बोल्टचा चेंडू समजला नाही. बोल्टचा चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन गेला... स्लीपमध्ये उभा असलेलेल्या जेसन होल्डर याने हवेत झेपवत अप्रतिम झेल घेतला. बोल्टने पहिल्याच षटक निर्धाव फेकत हैदराबादच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. ट्रेंट बोल्ट याने पावरप्लेमध्ये तीन षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकत दोन विकेट घेतल्या. बोल्टने तीन षटकात अवघ्या आठ धावा देत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले.

हैदराबादची अचूक टप्प्यावर गोलंदाजी -  

बोल्टसह इतर गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. केएम आसिफ, जेसन होल्डर, रविचंद्र अश्विन, यजुवेंद्र चहल यांनी भेदक मारा केला. युजवेंद्र चहल याने सर्वाधिक चार विकट घेतल्या. तर जेसन होल्डर आणि अश्विन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. तर बोल्टला दोन विकेट मिळाल्या.

दरम्यान, हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  

जोस बटलरचे झंझावत -

गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. यंदाही पहिल्याच सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. जोस बटलर याने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. बटलरपुढे हैदराबादच्या गोलंदाजाची दयनीय अवस्था झाली होती. जोस बटलर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भुवनेश्वर कुमार, फारुकी, वॉशिंगटन सुंदर, नटराजन यांचा त्याने समाचार घेतला. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांची खेळी केली. फारुकीने अप्रितिम चेंडूवर जोस बटलरला त्रिफाळाचीत बाद केले. जोस बटलर याने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. बटलरने पावर प्लेच्या षटकाचा फायदा घेत धावांचा पाऊस पाडला. 

यशस्वी जायस्वाल- बटलरची आक्रमक सुरुवात, पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा

बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अवघ्या 5.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. यामध्ये जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांचे योगदान दिलेय. पहिल्या विकेटसाठी बटलर आणि जयस्वाल यांनी 85 धावांची भागिदारी केली.  जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फटकेबाजीपुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. या दोघांच्या विस्फोटक फंलदाजीमुळे राजस्थानने पहिल्या सहा षटकात 85 धावांचा डोंगर उभारला. पावरप्लेमधील ही राजस्थानची सर्वाधिक धावसंख्या आहे. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांच योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल याने 13 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. 

यशस्वीचे दमदार अर्धशतक - 

यशस्वी जयस्वाल याने दमदार अर्धशतक झळकावले. जयस्वाल याने 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. एका बाजूला जोस बटलर आणि संजू सॅमसन विस्फोटक फलंदाजी करत होते, तेव्हा दुसऱ्या बाजूला यशस्वीने संयमी फलंदाजी केली. यशस्वीने 54 धावांच्या खेळीमध्ये 9 चौकार लगावले. फारुकीने यशस्वीची खेळी संपुष्टात आणली. यशस्वीने जोस बटलरसोबत पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली. तर संजूसोबत दुसऱ्या विकेटला 40 चेंडूत 54 धावा जोडल्या. 

संजू सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी - 

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यानंतर संजू सॅमसन यानेही अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसन याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन याने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. नटराजन याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन बाद झाला. अभिषेक शर्मा याने सिमारेषावर संजूचा अप्रतिम झेल घेतला. संजू सॅमसन याने 32 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. या खेळीदरम्यान संजू सॅमसन याने चार षठकार आणि तीन चौकार लगावले. 

हैदराबादकडून कुणाची गोलंदाजी कशी - 

भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक धावा खर्च केल्या. भुवनेश्वर कुमार याने तीन षटकात 36 धावा खर्च केल्या. नटराजन याने सर्वात कंजूष गोलंदाजी केली. नटराजन याने तीन षटकात 23 धावा खर्च केल्या. यादरम्यान नटराजन याने दोन विकेट घेतल्या. फारुकीने 4 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. उमरान मलिक यालाही एक विकेट मिळाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Faf Du Plessis : मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, PSL मध्ये खेळणार
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Embed widget