अर्शदीपच्या 4 विकेट, पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय; सूर्या-ग्रीनची अर्धशतके व्यर्थ
MI vs PBKS, IPL 2023 : सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी अर्धशतके झळकावली. पण मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले.
MI vs PBKS, IPL 2023 : अर्शदीप सिंह याच्या चार विकेटच्या बळावर पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी अर्धशतके झळकावली. पण मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. कारण, अखेरच्या दोन षटकात अर्शदीप याने अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच संघ सहा विकेटच्या मोबदल्यात २०१ धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबने अखेरच्या पाच षटकात ९६ धावा चोपल्या होत्या. मुंबईला अखेरच्या पाच षटकात ६७ धावा चोपता आल्या नाहीत. दोन्ही संघात हाच मोठा फरक जाणवला. पंजाबच्या जितेश शर्मा याने अखेरच्या षटकांमध्ये सात चेंडूत चार षटकार लगावले होते.. हाच दोन्ही संघातील फरक दिसून आला.
पंजाबने दिलेल्या २१५ विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज ईशान किशन अवघी एक धाव काढून तंबूत परतला. मुंबईच्या आठ धावा झाल्या असताना अर्शदीप सिंह याने ईशान किशान याला तंबूत धाडले. त्यानंतर रोहित शर्माने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. रोहित शर्माने कॅमरुन ग्रीनला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दोघांनी ७५ धावांची भागिदारी केली.
रोहित शर्मा ४४ धावांची महत्वाची खेळी केली. रोहित शर्मा याने २७ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. रोहित शर्माने मुंबईच्या डावाला आकार दिला. लायम लिव्हिंगस्टोन याने रोहित शर्माला बाद करत पंजाबला मोठे यश मिळवून दिले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याने सूर्यकुमार यादवला सोबत घेत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. कॅमरुन ग्रीन याने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. कॅमरुन ग्रीन याने ४३ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत कॅमरुन ग्रीन याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले... कॅमरुन ग्रीन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर मैदानाच्या चोहोबाजूने फटकेबाजी केली.
कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादव याने आपल्या खास स्ट्राईलमध्ये पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकमार यादवला अर्शदीप सिंह याने बाद केले. सूर्यकुमार यादव याने २६ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादव याने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव मोठा फटका मारला पण अथर्व तायडे याने झेल घेत पंजाबला मोठे यश मिळवून दिले. अर्शदीपने आठराव्या षटकात सूर्यकुमार यादवला बाद करत पंजाबला सामन्यात परत आणले होते. १९ व्या षटकात टीम डेविड याने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईला सामन्यात परत आणले होते. या षटकात टीम डेविड याने १५ धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. अर्शदीप याने भेदक मारा केला. अर्शदीप याने दोन चेंडूवर दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. आधी तिलक वर्मा आणि त्यानंतर नेहाल वढेरा यांचा त्रिफाळा उडवला. अखेरच्या षटकात अर्शदीप याने फक्त दोन धावा खर्च केल्या. टीम डेविड १३ चेंडूत २५ धावा करुन नाबाद राहिला.
Nerves of steel!@arshdeepsinghh defends 16 in the final over and @PunjabKingsIPL register a 13-run win in Mumbai 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
Scorecard ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/twKw2HGnBK
पंजाबकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अर्शदी याने चार षटकात २९ धावा खर्च करत चार फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांचा समावेश होता. अर्शदीपशिवाय लियाम लिव्हिंगस्टोन आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पण गोलंदाजीत धावा रोखू शकले नाहीत. नॅथन एलिस याने चार षटकात ४४ धावा खर्च केल्या. तर राहुल चहर याने चार षटकात ४२ धावा दिल्या. लियामने दोन षटकात २३ धावा दिल्या. सॅम करन याने तीन षटकात ४१ धावा खर्च केल्या.
दरम्यान, कर्णधार सॅम करनच्या वादळी अर्धशतकच्या जोरावर पंजाबने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार सॅम करन याने ५५ धावांची वादळी खेळी केली. तर हरप्रीत सिंह भाटिया याने जबदरस्त 41 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पीयूष चावला याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि मॅथ्यू शॉर्ट सलामीला उतरले होते. पण शॉर्ट लवकरच तंबूत परतला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी फक्त 18 धावांची भागिदारी केली. कॅमरुन ग्रीन याने शॉर्ट याला ११ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मराठमोळ्या तायडेने प्रभसिमरनसोबत धावांचा पाऊस पाडला. पंजाबने सहा षटकात ५८ धावा केल्या. पण त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरनला २६ धावांव बाद केले. ६५ धावांवर पंजाबला दुसरा धक्का बसला. त्यानंर ८२ धावांवर लियम लिव्हिंगस्टोनही तंबूत परतला. लिव्हिंगस्टोननंतर अथर्व तायडेही लगेच बाद झाला... पीयूष चावलाने लिव्हिंगस्टोन आणि तायडे यांना तंबूचा रस्ता दाखवला.
लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव ढेपाळला होता. पण त्याचवेळी कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत भाटिया यांनी डावाला आकार दिला. दोघांनी वेगाने धावा जमवल्या. १५ षटकांपर्यंत पंजाबने चार बाद ११८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक रुप धारण गेलेय. १६ वे षटक घेऊन आलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या षटकात ३१ धावा वसूल केल्या. त्यानंतर १७ व्या षटकात १३ धावा वसूल केलया. १८ व्या षटकात हरप्रीत भाटिया बाद झाला. ग्रीन याने हरप्रीतला बाद केले. पण त्या षटकात पंजाबने २५ धावा वसूल केल्या. सॅम करन आणि हरप्रीत भाटिया या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० चेंडूत ९२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर सॅम करन बाद झाला. सॅम करन याने चार षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने २९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.
सॅम करन बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडला. जितेश शर्माने सात चेंडूत चार षटकार लगावत २५ धावांची खेळी केली. पंजाबने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबद्लयात २१४ धावांपर्यंत मजल मारली. कॅमरुन ग्रीन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.