KKR vs LSG Playing 11 : लखनौ आणि कोलकाताचं प्लेऑफमधील आव्हान कायम, कोण बाजी मारणार? 'हे' 11 खेळाडू मैदानात उतरणार
LSG vs KKR, IPL 2023 Match 67 : आज कोलकाताच्या घरच्या मैदानावर केकेआर विरुद्ध लखनौ (LSG vs KKR) सामना रंगणार आहे. लखनौ संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
KKR vs LSG, Pitch Report : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज शनिवारी 20 मे रोजी डबल हेडर (Double Header) सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला डबल हेडर सामना लखनौ (LSG) आणि कोलकाता (KKR) यांच्यात होईल. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरोधात कोलकाता नाईट रायडर्स ईडन गार्डन्स (Kolkata Knight Riders) मैदानावर आमने-सामने येणार आहेत. कोलकाता चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर या सामन्यात उतरत आहे तर लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने त्यांच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला. प्लेऑफसाठीच्या पात्र होण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी आजचा सामना फार महत्त्वाचा ठरणार आहे.
लखनौ आणि कोलकाताचं प्लेऑफमधील आव्हान कायम?
प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाता संघाला विजयाची गरज आहे तर लखनौ संघाला केकेआरला मोठ्या फरकाने हरवून पहिल्या दोनमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी आहे. त्याशिवाय कोलकाता संघाला त्यांचा नेट रनरेट सुधारण्यासाठी आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आजच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज गुजरात आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.
KKR vs LSG Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या, मार्कस स्टोनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंह, मोहसीन खान.
KKR Probable Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्स
रहमनुल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
या सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल.