IPL 2023 Match 5 : मुंबईविरोधात आरसीबीचे कोणते 11 धुरंधर उतरणार, पाहा संभावित प्लेईंग 11
IPL 2023 : आरसीबीचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबईविरोधात रंगणार आहे.
IPL 2023, Royal Challengers Bangalore Playing 11 : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ आयपीएलच्या 16 व्या हंगामात उतरणार आहे. आरसीबीचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबईविरोधात रंगणार आहे. बेंगलोरमदील एम चि्नास्वामी स्टेडिअमवर दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरतील. गेल्या काही वर्षात आरसीबीची कामगिरी दमदार राहिली आहे. गेल्या वर्षी आरसीबीने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती, तर मुंबईचा संघ तळाशी राहिला होता. दोन एप्रिलपासून मुंबई आणि आरसीबी यांचा आयपीएल शुभारंभ होणार आहे. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. मुंबई विरोधात आरसीबी प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी देणार.. याबाबत जाणून घेऊयात....
2019 नंतर आरसीबी घरच्या मैदानावर खेळणार आहे. यंदापासून होम आणि अवे सामने होणार आहेत. RCB आयपीएलमधील आपला सुरुवातीचा सामना 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना आरसीबी घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. तब्बल 3 वर्षांनंतर आरसीबी संघ आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. तसेच आरसीबी त्यांचा शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.
संतुलित दिसतोय आरसीबीचा संघ -
आयपीएल 2023 मध्ये आरसीबीचा संघ इतर संघाच्या तुलनेत अधिक संतुलित दिसतोय. फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड यासराखे गोलंदाज आहेत. त्याशिवाय वानंदु हसरंगा आणि शाहबाज अहमद यांच्यासारखे फिरकीपटू आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो.
आरसीबीला धक्का -
आयपीएल 2023 सुरु होण्याआधीच आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. स्टार गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे काही सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय मॅक्सवेल याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. मॅक्सवेल याने गेल्यावर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. आरसीबीच्या विजयात मॅक्सवेल याने मोलाचा वाटा उचलला होता.
रजत पाटीदार हंगामातील पूर्वार्धातून बाहेर
संघाचा स्टार फलंदाज रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाच्या पूर्वार्धातून बाहेर असू शकतो. पाटीदार हा आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने एलिमिनेटर सामन्यात आपल्या शतकासह संघाला विजय मिळवून दिला होता. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानंदु हसरंगाही काही सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान तीन सामन्याची टी 20 मालिका होणार आहे. हसरंगा त्यामुळे 8 एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या दोन सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. दरम्यान, दुखापतीमुळे Will Jacks ही आयपीएलला मुकणार आहे. आरसीबीने Michael Bracewell याला त्याच्याजागी निवडले आहे.
मुंबईविरोधात आरसीबीची प्लेईंग 11 कशी असेल
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), फिन एलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, रीस टॉप्ले, मोहम्मद सिराज, करन शर्मा.