एक्स्प्लोर

IPL 2023 : शानदार शनिवार! आयपीएलमध्ये आज सामन्यांचा डबल धमाका, 'हे' चार संघ आमने-सामने

IPL Double Header, PBKS vs KKR and LSG vs DC : आज आयपीएल 2023 मधील पहिले डबल हेडर सामने रंगणार आहेत. पहिला सामना पंजाब आणि कोलकाता तर दुसरा सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात होणार आहे.

LSG vs DC and PBKS vs KKR : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिली डबल हेडर मॅच (IPL Double Header) म्हणजेच दोन सामने रंगणार आहेत. पहिला डबल हेडर सामना पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) तर दुसरा डबल हेडर सामना दिल्ली (Delhi Capitals) आणि लखनौ (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये गुजरातने चेन्नईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. आज आयपीएलचा दुसरा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. तर, तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ यांच्यात होणार आहे. आज शानदार शनिवार ठरणार असून यंदाच्या आयपीएलमधील पहिली डबल हेडर मॅच होणार आहे.

Punjab Kings vs Kolkata Knight Riders : पंजाब आणि कोलकाता यांच्यात लढत

आज शनिवारी (1 एप्रिल) आयपीएल 2023 मधील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात होणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाची अडचण वाढली आहेत. यासोबतच दोन्ही संघा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्स शिखर धवनच्या नेतृत्वात तसेच श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याचा अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान नितीश राणावर असेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ आणि दिल्लीत मुकाबला

आयपीएलमधील तिसरा सामना आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. लखनौ आणि दिल्ली यांच्यातील हा रणसंग्राम लखनौच्या घरच्या मैदानावर होणार आहे. लखनौमधील इकाना स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या मागील काही सीझनमध्ये दिल्लीच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये दाखली झाली होती. तर, 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ उपविजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. लखनौच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडूमुळे लखनौ संघाचं पारडही जड दिसत आहे. 

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget