Viral Photos of RCB: जर RCBनं यंदाच्या आयपीएलचा खिताब जिंकला तर... AIनं दाखवली सेलिब्रेशनची झलक
Royal Challengers Bangalore Viral Photos: ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि इतर सहकारी कसं सेलिब्रेशन करतील याचे AI च्या मदतीनं बनवलेले फोटो व्हायरल होत आहेत.
Viral Photos of RCB: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 65 व्या सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी पराभव केला. यासह, आता आरसीबी पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दरम्यान, आरसीबीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रं AI च्या मदतीनं बनवण्यात आली आहेत, ज्यामध्ये RCB यावेळी IPL चं जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली तर सेलिब्रेशन कसं असेल? हे दाखवण्यात आलं आहे. आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकावल्यानंतर खेळाडू कसं सेलिब्रेशन करतील? हे AI च्या मदतीन बनवलेल्या फोटोंमध्ये दाखवण्यात आलं आहे.
आरसीबीच्या चाहत्यांना हे फोटो सोशल मीडियावर खूप आवडले असून चाहतेही यंदाचं आयपीएल बंगळुरूचं जिंकणार असा दावा करत आहेत. AI च्या मदतीनं बनवण्यात आलेल्या फोटोंमध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली आणि इतर सहकारी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्याचबरोबर हे फोटो पाहून लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सीझनच्या सुरुवातीपासूनच आरसीबी शानदार खेळ करत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या सीझनमध्ये आरसीबी प्ले-ऑफमध्ये क्वॉलिफाय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यासाठी आरसीबीला उर्वरित सामना जिंकावाच लागेल. तसेच, इतर संघांची समीकरणंही पाहावी लागतील.
View this post on Instagram
फॅन्स म्हणतात...
आरसीबीचे हे फोटो शाहिद नावाच्या युजरनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत त्यानं लिहिलं आहे की, "यावेळी आरसीबी टीमनं ट्रॉफी जिंकली तर सेलिब्रेशन कसं असेल?" यावर एका यूजरनं लिहिलं आहे की, "हा विजय फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे." दुसर्या यूजरनं लिहिलंय की, "हे फक्त AI च्या मदतीनं शक्य आहे." त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, "हे स्वप्न कधी पूर्ण होईल माहित नाही." आयपीएलच्या इतिहासात RCB संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
विराट कोहलीचं वादळी शतक
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हैदराबादविरोधात झंझावाती फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार आणि 12 चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 172 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. पहिल्या डावात हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने शतकी खेळी केली होती. एकाच सामन्यात दोन संघांच्या खेळाडूंनी शतक झळकावण्याची दुर्मिळ गोष्ट घडली. विराट कोहली याच्या बॅटमधून यंदा धावाचा पाऊस पडला. विराट कोहलीचे आयपीएलमधील सहावे शतक होय.. विराट कोहली याने त्याचा जुना सहकारी ख्रिस गेल याची बरोबरी केली आहे. ख्रिस गेल याच्या सहा शतकाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आता सर्वाधिक शतकांची नोंद आहे.