खराब फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला सुनील गावसकरांचा लाखमोलाचा सल्ला, म्हणाले..
Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे.
Sunil Gavaskar advised Rohit Sharma to take a break : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने सात सामन्यात फक्त १८१ धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित शर्माच्या खराब फॉर्माचा फटका मुंबई इंडियन्सलाही बसत आहे. पण रोहित शर्मा याचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्माला आराम करण्याचा सल्ला दिलाय. भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे. सध्या रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गुजरातविरोधात रोहित शर्माने अवघ्या आठ चेंडूत दोन धावा केल्या. यंदाच्या हंगमात रोहित शर्मा याची बॅट शांतच आहे. आतापर्यंत सात डावात फक्त 25.86 च्या सरासरीने आणि 135.07 च्या स्ट्राइक रेटने फक्त 181 धावा कल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. गुजरातविरोधातील सामन्यानंतर बोलताना गावसकरांनी रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट छॅम्पियनशीपसाठी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. आयपीएलच्या अखेरच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला परत येण्याचा सल्ला दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा फिट राहण्याची गरज आहे.
रोहित शर्मा सध्या चिंतेत दिसत आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा विचार करत असेल. रोहित शर्मा याने तीन ते चार आयपीएल सामन्यादरम्यान ब्रेक घ्यावा.. आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यात पुनरागमन करावे. रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फॉर्मात असायला हवा, असे गावसकर म्हणाले.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय संघाची कमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट