IPL 2023 : पराभवानंतरही आयपीएलमध्ये गुजरातची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांसह इतरही विक्रम नावावर
IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. गुजरातने आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केला आहे.
GT vs CSK, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामाच्या विजेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सनं नाव कोरलं. चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. अतिशय रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला पराभूत केलं. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामन करावा लागला असला, तरी गुजरातने या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले आहेत.
आयपीएलमध्ये गुजरातची ऐतिहासिक कामगिरी
आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. गुजरातने आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केला आहे. तर गुजरातचा फलंदाज साई सुदर्शनच्या 96 धावांची खेळी करत अनेक विक्रम केले. अंतिम सामन्यात सुदर्शनचं शतक हुकलं, पण या सामन्यात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झालं. गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरातने या टोटलसह अनेक विक्रम केले. त्याचबरोबर साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची खेळी करत अनेक विक्रम केले.
अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा ठोकणारा संघ
गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. इंडियन प्रीमियरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 7 बाद 208 धावा केल्या होत्या. तर या आकडेवारीत चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या अंतिम सामन्यात चेन्नईने 205 धावा केल्या होत्या.
आयपीएल अंतिम सामन्यात सर्वाधिक धावसंख्या
संघ | विरुद्ध संघ | हंगाम | धावसंख्या |
गुजरात टाइटन्स | चेन्नई सुपर किंग्स | 2023 | 214/4 |
सनरायजर्स हैदराबाद | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 2016 | 208/7 |
चेन्नई सुपर किंग्स | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 2011 | 205/5 |
मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्स | 2015 | 202/5 |
कोलकाता नाइट रायडर्स | किंग्स इलेव्हन पंजाब | 2014 | 200/7 |
साई सुदर्शनच्या नावे नवा विक्रम
गुजरातच्या साई सुदर्शनने 47 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 96 धावांची खेळी केली. सुदर्शन आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड म्हणजे असा खेळाडू ज्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
आयपीएल प्लेऑफमधील अनकॅप्ड खेळाडूंची सर्वोच्च धावसंख्या
- 112* - रजत पाटीदार (RCB) वि LSG, कोलकाता, 2022 एलिमिनेटर
- 96 - साई सुदर्शन (GT) वि CSK*, अहमदाबाद, 2023 अंतिम सामना
- 94 - मनीष पांडे (KKR) विरुद्ध PBKS, बेंगळुरू, 2014 अंतिम सामना
- 89 - मनविंदर बिस्ला (KKR) विरुद्ध CSK, चेन्नई, 2012 अंतिम सामना